History of Maharashtra

संवाद हेच व्यक्तिमत्व विकासाचे महत्वाचे साधन - अनिरुद्ध देवचक्के

अहमदनगर । DNA Live24वाचन आणि लिखाण ही जगण्याची शैली आहे. संवाद हे व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्वाचे साधन असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेचे अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व न्यू आर्टस, कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर होते. श्री रेणुकामाता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भालेराव, सुमित्रा घुले, उपप्राचार्य विक्रम लांडे, डॉ. अनिता आढाव, कवयत्री अस्मिता मराठे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देवचक्के म्हणाले, मागील दहा-पंधरा वर्षांत विचार करण्याची क्षमता संवाद कमी झाल्यामुळे थंडावली आहे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी हा धोका आहे. वैचारिक कौशल्य विकसित करण्याची गरज आहे.

जो वाचतो, तो विचार करतो. त्याला ज्ञान मिळते. विचार व्यक्त करण्यासाठी शब्दांचा साठा पाहिजे. चांगले-वाईट काय, याचा विचार न करणे हा दुर्गुण आहे. लिखाण जगण्यासाठी बळ देते. आपला विश्‍वास वाढविते. त्यामुळे लिखाण केले पाहिजे, वाचन-लिखाण ही जगण्याची शैली असे ठरविले, तरच त्याचा फायदा होतो. संवाद हे व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. बोलण्यातून शब्दाशब्दातून आत्मविश्‍वास वाढला पाहिजे. त्यासाठी श्रवण कौशल्य विकसित होणे महत्त्वाचे आहे.

श्रवण व संभाषण मिळून संवाद होतो. विद्यार्थ्यांमध्ये लिहिण्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी मसापच्या वतीने महाविद्यालय पातळीवर मसाप संवाद केंद्र सुरू करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भालेराव म्हणाले, यशस्वी होण्यासाठी काही प्रश्‍नांची उत्तरे आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. काय करायचे आणि ते मी करणारच. आत्मविश्‍वासाने वाटचाल केल्यास यशाच्या शिखरावर जातो. विद्यार्थ्यांनी आताच ध्येय्यधोरणे निश्‍चित करावीत.

प्राचार्य डॉ.लक्ष्मणराव मतकर यांनी मसाप संवाद केंद्र स्थापन करण्याच्या कल्पनेचे स्वागत केले. न्यू आर्टस कॉलेजात मराठी विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल,असे त्यांनी सांगितले. प्रारंभी सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बाल कवयत्री अस्मिता मराठे व स्वप्नाली राजेभोसले यांनी कविता सादर केल्या. प्राध्यापक घुले, डॉ. आढाव यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शीतल धरम यांनी, तर छाया भालशंकर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget