History of Maharashtra

रुबल अग्रवाल शिर्डी देवस्थानच्या नवीन सीईओ !

शिर्डी l DNA Live24 - गेल्या तीन वर्षांपासून जळगावच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणार्‍या रुबल अग्रवाल यांची शिर्डी संस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने १५ मार्च पूर्वी आयएएस अधिकारी नेमण्याचे आदेश शासनाला दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने ही नियुक्ती केली आहे.

देवस्थान वर जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने देवस्थानवर पहिल्या महिला आयएसए अधिकारी म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे. दरम्यान त्या उद्या गुरुवार दि. ९ रोजी पदभार स्वीकारणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने आदेश काढून त्यांना नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

अग्रवाल यांनी २०११ ते २०१३ या काळात अहमदनगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केलेले आहे. त्यांच्या कार्यकाळात नगर जिल्हा परिषद प्रशासनात अनेक सकारात्मक प्रशासकीय बदल झालेले आहेत. यामुळे नगर जिल्हा परिषदेतून त्यांची नगरच्या जिल्हाधिकारी पदावर पदोन्नतीने बदली झाली. अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती देखील घेतली. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे अग्रवाल यांची जळगाव जिल्हा परिषदेत बदली झाली. आता जळगावमध्ये जिल्हाधिकारी पदाचा अग्रवाल यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.

Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget