History of Maharashtra

विवेकाची होळी खेळू, पर्यावरणाचा ऱ्हास टाळू !

अहमदनगर । DNA Live24 - वृक्षांची अनावश्यक कत्तल, विषारी रंगांचा वापर आणि मादक पदार्थांचे सेवन यामुळे होळीच्या सणाला विकृत स्वरूप प्राप्त होत आहे. त्यातून सामाजिक आरोग्याला बाधा येत असतानाचा पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. अशा घातक प्रथांना प्रतिबंध व्हावा म्हणून ‘सावली’ संस्थेच्या वतीने ‘विवेकाची होळी खेळू ! पर्यावरणाचा ऱ्हास टाळू' या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे सुधारणावादी विचारांचे प्रचारक शामसुंदर महाराज सोन्नर मार्गदर्शन करणार आहेत.

बदलत्या लोकजीवनानुसार सर्वच सण, उत्सव आणि परंपरांना विकृत स्वरूप येत आहे. त्यातून समाजाचे आणि पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत आहे. हे थांबविण्यासाठी सर्व विवेक्की सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जनजागृती आणि प्रबोधन करण्याची गरज आहे. त्यासाठी अहमदनगर येथे ‘सावली’ने पुढाकार घेतला असून होळीच्या पूर्वसंध्येला ११ मार्चला सायंकाळी ५ वाजता शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे, अशी माहिती नितेश बनसोडे यांनी दिली.

केडगावातील सावली संस्थेच्या कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. सोन्नर हे विविध विषयावर सामाजिक प्रबोधन करतात. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला तेव्हा ‘शेतकरी संवाद अभियाना’ त सहभागी होऊन त्यांनी किर्तनातून शेतकऱ्यांना धीर दिला होता. ‘स्त्री जन्म म्हणणोनी न व्हावे’ उदास हा जनाबाईंचा संदेश त्यांनी कीर्तनातून गावागावात पोहचविला. ऑर्थर रोड कारागृहात ‘आता तरी पुढे हाच उपदेश ! नका करू नाश आयुष्याचा’ या अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन केले.

शेतकरी आत्महत्येच्या समस्या व दुष्काळावर त्यांनी लिहिलेल्या कवितांनी सोशल मिडियावर रान उठविले. सलग तीन विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांच्या कविता विधानसभा व विधान परिषद आमदारांनी वाचल्या. कवी, पत्रकार, साहित्यिक, कीर्तनकार, व्याख्याते असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या शामसुंदर महाराजांचे प्रबाेधन सर्वांनी ऐकावे, असे आवाहन ‘सावली’च्या वतीने नितेश बनसोडे यांनी केले आहे.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget