728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

शरद पवार राष्ट्रपती पदाचे उमेदवार?, मोदी-पवार यांच्यात गुफ्तगू

नवी दिल्ली l DNA Live24 - संसद भवनातल्या पंतप्रधानांच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांमध्ये भेट झाली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली. मात्र भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. 

आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही चर्चा झाल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही सविस्तर चर्चा त्यांच्यात झाली. पाच राज्यांच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच संसदेत उपस्थित होते. संसदेच्या कामकाजानंतर पंतप्रधानांच्या संसदेतील कार्यालयात शरद पवारांनी मोदींची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

येत्या जून महिन्यात राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. निवडणुकीत राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे पवार- मोदी यांच्या या चर्चेला महत्व प्राप्त झाले आहे. बारामती मधील एका कार्यक्रमात मोदींनी शरद पवार हे गुरु असल्याचे जाहीर सांगितले होते. त्यामुळे गुरु शिष्याची जोडी राष्ट्रीय राजकारणात एकमेकांना मदत करणार का? हाच मोठा प्रश्न आहे. तसेच शरद पवारांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी मिळण्याचेही संकेत दिल्लीच्या राजकारणात दिसत आहेत.
शरद पवारांनी मोदींकडे केल्या या मागण्या - शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमाफी द्यावी.
साखर कारखान्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: शरद पवार राष्ट्रपती पदाचे उमेदवार?, मोदी-पवार यांच्यात गुफ्तगू Rating: 5 Reviewed By: DNA Live24