History of Maharashtra

पांगरमल प्रकरणाला वरिष्ठ अधिकारीच जबाबदाऱ - भोर

अहमदनगर । DNA Live24 - पांगरमल (ता.नगर) व जिल्ह्यातील इतर ठिकाणी बनावट विषारी दारू सेवन केल्यामुळे एकाच महिन्यात १५ जणांना जीव गमवावा लागला. हा आकडा केवळ उघडकीस आलेल्या प्रकरणांतील आहे. याच कारणाने यापूर्वी बळी गेलेल्यांची प्रकरणे गिणतीतही आली नाहीत. बनावट विषारी दारू बनविण्याचे केंद्र हे जिल्हा रूग्णालय होते हे उघड झाले आहे. तरीही तीन कनिष्ठ कर्मचाऱ्यांना निलंबित केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई का केली नाही, असा सवाल शिवप्रहारचे संस्थापक संजीव भोर यांनी प्रसिद्धी पत्रकातून  उपस्थित केला अाहे.

भोर यांनी म्हटले आहे  की, बनावट दारूकांडास व अनेकांच्या मृत्यूस जिल्हा रूग्णालय, पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकार्यांची हप्तेखोरी कारणीभूत आहे. या विभागांचे दारूकांडातील आरोपींशी लागेबांधे,अर्थपूर्ण संबंध असल्यानेच पोलिस स्टेशनला लागून शासकिय इमारतीत हा अड्डा राजरोस सुरू होता. अवैघ धंद्यांवर जेव्हा वरवरची कारवाई होते, तेव्हा वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केल्याचा गवगवा होतो.

जिल्हा रूग्णालयात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या दारू अड्ड्याबाबत वरिष्ठ अधिकार्यांनी कारवाईसाठी मार्गदर्शन का केले नाही, या अड्ड्याकडे वरिष्ठ अधिकारांनी डोळेझाक करण्याचे कारण काय? आता हा भिषण प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर पोलिस अधिक्षक सौरभ त्रिपाठींनी तोफखाना पोलिस स्टेशनचे तीन कर्मचार्यांना निलंबित केले. पोलीस निरीक्षक रविंद्र निकाळजेंची बदली नियंत्रण कक्षात केली. आरोपींशी थेट संबंध असलेल्या इतर कर्मचार्यांचे निलंबन पद्धतशीरपणे टाळण्यात आले.

एव्हढे मोठे प्रकरण होऊनही पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते विखे व लोकप्रतिनिधी पोलिस अधिक्षक सौरभ त्रिपाठी, उत्पादन शुल्क अधिक्षक भाग्यश्री जाधव व जिल्हा शल्य चिकित्सक एस एम सोनवणे व संबंधित भ्रष्ट अधिकार्यांवर कारवाईसाठी आग्रही भूमिका घेत नाहीत, यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्नही भोर यांनी उपस्थित केला आहे. तसेच शिवप्रहार संघटना याबाबत लवकरच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

पोलिस अधीक्षक 'सेफ' - पोलिस निरीक्षक रविंद्र निकाळजे यांचे निलंबन करायचे टाळून इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील कारवाईस टाळले आहे. मुळातच या सर्व गंभीर प्रकाराला पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी हेच पूर्णपणे जबाबदार आहेत. तेच खालच्या कर्मचार्यांवर वरवरची कारवाई करून कारवाईचा आभास निर्माण करीत आहेत. स्वत: नामानिराळे असल्याचा आव आणून जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्यांच्यावरच कारवाई व्हायला हवी, असे भोर यांचे म्हणणे आहे.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget