History of Maharashtra

महिलांनी संघर्ष करुन मिळवले आपले हक्क - कॉ. स्मिता पानसरे


अहमदनगर । DNA Live24 - महिलांनी संघर्ष करुन आपली हक्क मिळवली. मात्र आजही महिला आपल्या हक्कासाठी संघर्ष करत आहे. ती सर्व क्षेत्रात आपली गुणवत्ता सिध्द करत असताना, स्त्री भ्रुणहत्येचे पाप समाजात घडत आहे. महिला कुटुंबाचा कणा असून, कुटुंबामध्ये महिलांना आदराची वागणुक दिल्यास बदल घडणार असल्याची अपेक्षा महाराष्ट्र राज्य महिला फेडरेशनच्या सचिव कॉ. स्मिता पानसरे यांनी व्यक्त केली.

जपानमध्ये कार्ला जस्कीन यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आपल्या हक्कासाठी केलेल्या रक्तरंजीत क्रांतीने ८ मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत असल्याची त्यांनी माहिती दिली. महिला दिनानिमित्त श्रमिकनगर येथे आयोजित कामगारांच्या मेळाव्यात पानसरे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुचम्मा श्रीमल तर प्रमुख पाहुण्या म्हणून बेबी लांडे, नगरसेविका वीणा बोज्जा, शंकर न्यालपेल्ली, सुभाष लांडे, सुधीर टोकेकर, बन्सी सातपुते उपस्थित होते.

सगुणा श्रीमल म्हणाल्या, वीस वर्षापुर्वी विडी कामगारांच्या मुलींना लग्न जुळवताना विडी वळवता येते का, असे विचारले जायचे मात्र आज मुलगी किती शिकली, हा प्रश्‍न विचारला जातो. हा बदल विडी कामगार महिलांनी घडवला. त्यांनी आपल्या मुलांच्या हातात विडी वळण्याऐवजी लेखणी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत भारती न्यालपेल्ली यांनी केले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते ज्येष्ठ विडी कामगार तथा लिलाबाई कैरमकोंडा यांचा गौरव करण्यात आला.

वीणा बोज्जा म्हणाल्या, महिलांना 50 टक्के आरक्षण कागदोपत्री मिळाले. याबाबत महिलांमध्ये जागृती नसून, स्वत:चे हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याचे त्यांनी सांगितले. बेबीताई लांडे यांनी महिलांनी समान हक्कासाठी लढा केल्याने. आज वडिलांबरोबर आईचे नाव लावले जाते. सर्व मुलींना उच्चशिक्षित करण्याचे त्यांनी आवाहन केले. मेळाव्यात रोहिणी म्याना, भाग्यलक्ष्मी गड्डम, भारती न्यालपेल्ली, संगिता कोंडा, सविता देवसान, सुनिता बिटला या महिलांनी आठ कलमी ठराव मांडला.

सर्व शिक्षित महिलांना शासकीय, निमशासकीय व खाजगी कंपनीत नोकरीमध्ये ५० टक्के आरक्षण निश्‍चित करावे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना सेमी इंग्रजीचे शिक्षण द्यावे. सुशिक्षित बेरोजगार युवतींना दरमहा अडीचशे चा भत्ता मिळावा. तेलंगना मधील विडी कामगारांप्रमाणे महाराष्ट्र सरकारने जीवन भत्ता म्हणून १ हजार रुपये सुरु करावे. विडी कामगारांना पुर्वीप्रमाणे साप्ताहिक मजुरी द्यावी. सावेडी उपनगरातील शेतसारा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेने पाणी पट्टीत वाढ करु नये. ६० वर्ष पुर्ण झालेल्या ज्येष्ठ महिलांना दरमहा अडीच हजार रुपये देण्याचा ठरामध्ये उल्लेख आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आश्‍विनी नल्ला यांनी केले. उपस्थितांचे आभार शोभा बडगू यांनी मानले. मेळाव्यास विडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget