728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

निमगाव वाघाच्या अंगणवाडीत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी


अहमदनगर । DNA Live24 - भारत सरकारचे नेहरु युवा केंद्र संलग्न स्व. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व नवनाथ युवा मंडळाच्या वतीने नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील डोंगरेवस्ती अंगणवाडीत विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटवून अंगणवाडी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉ. विजय जाधव यांच्या हस्ते झाले.

यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे, सचिव मंदाताई डोंगरे, राष्ट्रीय खेळाडू प्रतिभा डोंगरे, किरण ठाणगे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, दादा डोंगरे, अंगणवाडी सेविका वैशाली फलके, भामाबाई भुसारे, वैभव पवार, भाऊसाहेब ठाणगे, रितेश डोंगरे, मयुर काळे, रामदास बोडखे, दामोदर ठाणगे, आशा ठाणगे, बाळू बोडखे, निर्मला डोंगरे, अभय डोंगरे, प्रियंका डोंगरे, सचिन जाधव आदि उपस्थित होते.

यावेळी नाना डोंगरे म्हणाले की, निरोगी आरोग्यासाठी गावात स्वच्छता महत्त्वाची आहे. गावात स्वच्छता ठेवण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतल्यास बदल घडणार आहे. ग्राम स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगे महाराजांच्या विचारांची आज सर्वांना गरज वाटू लागली आहे. आजार होण्यापुर्वीच त्याचा प्रतिबंध केल्यास जीवन निरोगी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित असलेले ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांना महिला सक्षमीकरण, मुलगी वाचवा - मुलगी शिकवा, रोखमुक्ती व्यवहार अभियान, मतदार जागृती, पर्यावरण जागृती व युवा जागृती अभियानाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: निमगाव वाघाच्या अंगणवाडीत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी Rating: 5 Reviewed By: DNA Live24