History of Maharashtra

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ठोस उपायांची गरज - दुलम


अहमदनगर । DNA Live24 - जागतिक महिला दिन मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात येतो. पण आजकाल मुलींवर, महिलांवर होणारे अत्याचार कमी होण्यापेक्षा वाढतच चालले आहेत. आरक्षणाप्रमाणे महिलांना संरक्षण हवे. जागतिक महिला दिन फक्त साजरा करण्यापुरता नको. तर महिलांवर होणाऱ्या अत्यांचारांवर ठोस उपाय करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नगरसेवक मनोज दुलम यांनी केले. श्रमिकनगर येथे पाईपलाईन रोड, वस्तीस्तर संघाच्या वतीने रांगोळी स्पर्धा आणि फक्त मुली असलेल्या महिलांना आदर्श महिला म्हणुन गौरविण्यात आले.

याप्रसंगी नगरसेविका वीणा बोजा, विक्रम सरगर, कृष्णा सरगर, विद्या एक्कलदेवी, सोनाली परळकर, रोहिणी म्याना, चंद्रकला गेंट्याल, सविता देवसानी, मंगेश काळे, प्रियंका येडीसन, लकी आणि स्वागत साळी उपस्थित होते. सोमप्रभा जिंदम, रेखा दुलम, वैशाली बोगा, अश्‍विनी येनगंदुल, शारदा दिकोंडा, सुशीला कोंडा, यांना नगरसेवक मनोज दुलम व नगरसेविका वीणा बोजा यांचे हस्ते गौरविण्यात आले.

रांगोळी स्पर्धेतील प्रथम विजेता सोमप्रभा जिंदम यांना नगरसेवकांच्या वतीने 500 रुपये रोख, व्दितीय विजेता रेखा दुलम यांना 400 रुपये रोख, तृतीय विजेता अंबिका दिकोंडा यांना 300 रुपये रोख व महिला बचतगट तर्फे सर्वांना भेटवस्तु म्हणुन पर्स देण्यात आल्या. मनोज दुलम म्हणाले आई, मुलगी, बहिण, पत्नी, माऊशी, आत्या, मामी, यांनी केलेल्या स्वयंपाकामुळेच आपण आपल्या पोटाची भुक जिवनभर भागवितो. आपल्याला जगात आणणारी व जग दाखविणारी स्त्रीच ती म्हणजे माझी, तुमची आई.

महिलांवर अत्याचार स्त्रीभ्रुण हत्या, विनयभंग, बलात्कार करणारे मनुष्य नाहीत. यामुळे भारतात महिला सुरक्षीत नाही. जग किती मॉर्डर्न होत असले तरी आपण आपली वेशभुषा, संस्कृती, परंपरा, संस्कार विसरता कामा नये. गणपती, नवरात्र व इतर काही उत्सवाच्यावेळी श्रमिकनगर नवरात्र उत्सव मंडळातर्फे महिलांनी घरातुन बाहेर पडावे यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन सातत्याने केले जात असते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्या एक्कलदेवी यांनी मानले.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget