History of Maharashtra

महिलांनी बचत गटातून प्रगती साधावी : शालिनीताई विखे

नगर l DNA Live24 - महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून संधीचे सोने केले पाहिजे. शहरात तसेच ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांनी बचत गट स्थापण करून प्रगती साधावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी केले.

नगर येथे राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत ग्राम विकास विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रनेच्या संयुक्त विद्यमाने साई ज्योती महिला स्वयंसहाय्यता गटाचे जिल्हा प्रदर्शन गुलमोहर रोड पारिजात चौक येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री घुले, खासदार दिलीप गांधी,  मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे , जि. प. सदस्या हर्षदा काकडे, राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्या संदेश कार्ले, अनिल कराळे, महापौर सुरेखा कदम, माजी सभापती बाबासाहेब दिघे, माजी जि.प. सदस्य बाजीराव गवारे, जि. प. सदस्या सुप्रिया झावरे, अनिल कराळे, रामभाऊ सावळे, आश्‍विनी थोरात, सुनिल गायकवाड, ज्ञानेश्‍वर साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरोडे, संगिता खरमाळे, संगिता दुसुंगे आदी उपस्थित होते.

विखे म्हणाल्या की, साई ज्योती महिला स्वयंसहाय्यता गटाला सुरू केलेले आज 10 वर्ष पूर्ण झाले आहे. शहरात तसेच ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांनी बचत गट स्थापन केले पाहिजेत. त्या माध्यमातून ग्राम विकास साई ज्योती गटात महिलांनी 250 ते 300 महिलानी सहभाग घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. थोर पुरूषांचेचे आदर्श डोळ्या समोर ठेऊन, गावा गावात विकास कामे केली जातील. आगामी काळात मुंबई सारख्या ठिकाणी बचत गटाचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. बचत गटांना येणार्‍या अडी अडचनी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महिलांनी बनवलेल्या नाविण्यपूर्ण पदार्थांचे स्टॉल लावले अाहेत, असेही त्यांनी सांगितले. 

खासदार गांधी म्हणाले, महिलांनी स्वता:च्या पायावर उभे राहावे व आपल्या गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून साई ज्योती स्वयंसहाय्यता गटाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. बचत गटाच्या माध्यमातून नगर जिल्ह्याचे नाव व्यक्तीगत झाले असुन, विविध विकास कामे महिलांना बचत गटाच्या माध्यमातून करता येणार आहे. तसचे महिला बचत गटासाठी 1 कोटी कर्जाचे वाटप करण्यात आली असुन, ऑनलाईन पध्दतीने कर्जाचे फार्म भरता येणार आहेत. महिला बचत गटाना ग्रामीण भागाचा केंद्र बिंदु मानून महिला बचत गटांना मदत करणार आसल्याचे गांधी यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले म्हणाल्या, शेवगाव तालुक्यात 10 हजार महिला बचत गटाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबीचा उदरनिर्वाह करत असून, त्यांच्या साठी जास्तीत जास्त बचत गट स्थापन करून सर्वतोपरी पयत्न करणार आहे. यावेळी महिला बचत गटाच्या वतीने विविध प्रकारचे स्टॅल उभारले होते. कार्यक्रमाचे प्रास्थाविक मुख्य कार्यकारी अधिकारी रवीद्र बिनवडे यांनी केले. तर प्रकल्प संचालक सुनिल गायकवाड यांनी आभार मानले.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget