History of Maharashtra

तरच जिंकू हक्काची लढाई !

महिला दिन विशेष । DNA Live24

८ मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. खरं म्हणजे महिलांनीच महिलांच्या हक्कांसाठी केलेली लढाई. आणि या लढाईत त्यांना या दिवशी आलेले यश. अन् तेव्हापासुन ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. खरं म्हणजे संपूर्ण विश्वाची निर्मिति जिच्यापासुन होते तिच्यासाठी प्रत्येक दिवस हा 'महिला दिन' असायलांच हवा.

आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम करताना दिसते. ते  आमच्या क्रांतिज्योती सावित्रीबाईंमुळेच. स्त्री शिक्षणाची कवाडे महिलांसाठी सावित्रीबाईंनी उघडल्यामुळे आज प्रत्येक स्त्री उच्च शिक्षित होवून वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. आज महिला सक्षमीकरणासाठी शासन करोडो रूपयांच्या योजना राबवत आहे. हे जरी खरे असले तरी मनाला एकच प्रश्न नेहमी छळतो. तो म्हणजे कि खरचं हा करोडो रुपयांचा कागदोपत्री दाखवलेला खर्च हा नेमका कोणत्या महिलांसाठी असतो ? आणि खरोखर महिलांसाठी असलेल्या योजना १०० % राबवल्या जातात का?

आज एकच सांगावे वाटते, कि आम्हा महिलांना हा करोडो रुपयांचा हा शासनाचा निधी नको आहे. आम्हाला हवी आहे या समाजात वावरताना सुरक्षा. आम्हाला हवाय पुरूषांच्या बरोबरीने मान-सन्मान. आमच्यासाठी असलेले कायदे फक्त कागदोपत्री न राहता ते तत्काळ अंमलबजावणी करणारे असावेत. न्याय देणारे असावेत.

आज प्रत्येक महिला या समाजात वावरताना स्वत्ःला सुरक्षित समजत  नाही. कारण आजचा उच्चशिक्षित समाज अजुनही महिलांना हवे तेवढे महत्व द्यायला तयार नाही. ती कितीही उच्चशिक्षित असली तरीही तिचे चार भिंतीच्या आत आणि नोकरीच्या ठिकाणी खच्चीकरण होतंय, हे नक्कीच.

राजकिय क्षेत्रात महिला आरक्षण असेल तर फक्त निवडुन येण्यापुरताच तिचा वापर केला जातो. अगदी प्रचाराला सुद्धा पतीराजे मित्रमंडळींना घेवून जातात. पण तिला घराबाहेर पडू दिले जात नाही. ज्या खुर्चीवर बसण्यासाठी राजकीय धुरा सांभाळण्यासाठि ती निवडुन आलेलि असते त्या खुर्चीवर मात्र पतीराजेच विराजमान झालेले दिसतात .यालाच म्हणतात का महिला आरक्षण ? जी स्त्री आपला संसार, घरदार, आपल्या प्रत्येक जबाबदारया उत्तमरित्या पार पाडु शकते, ती नक्कीच खुर्चीतील जबाबदाऱ्याही उत्तमरित्या यशस्वीपणे पार पाडू शकते. 

सखी, तू स्वत:ला कधीच कमजोर समजू नकाे. परिस्थितीअभावी जरी तुला शिक्षण घेता आले नाही, तरी तू नेहमी विचारांनी उच्चशिक्षित रहा. तुझा आत्मविश्वास कधीच ढासळू देऊ नको. जीवन हे सुख-दुखाःनी भरलेला बाजार आहे. आणि या बाजाराच्या मैदानात तू तुझ्या जीवनात आलेल्या दुखाःना चितपट करायला शिक. 

अनेकदा काही महिलांना शिक्षण घेता येत नाही. मग त्या स्वतःला नेहमी इतरांच्या तुलनेत कमी समजतात. आयुष्यभर दोष देण्यापेक्षा जीवनात शिकण्यासारखं खूप काही असते. ते आत्मसात करून नेहमी सकारात्मक जीवन जगायला शिकले पाहिजे. कुठलीही गोष्ट जगात अशक्य नसते. एवढंच म्हणा I Can Do It.

सखे, जाता जाता एकच म्हणेल "अंगी खंबीर आत्मविश्वास अन् अचूक निर्णय घेण्याची क्षमता असेल, तर जीवन नेहमी आनंदात जगता येईल. अन् आपलं काहीतरी चुकतंय, अन् समाज काय म्हणेल या विचारातच जर आपण जगलो, तर सारं आयुष्य दुखाःतच जाईल". त्यापेक्षा उठ, उभी रहा, अन् स्वत:ला सिद्ध करुन दाखव.

महिला दिनाच्या सर्व सख्यांना हार्दिक शुभेच्छा !

- आशा साठे (अध्यक्षा, महिला बचतगट)
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget