History of Maharashtra

महिला दिनानिमित्त 'विवाहदृष्टी भेट' नेत्रशिबीर

अहमदनगर । DNA Live24 - मानकन्हैय्या ट्रस्ट व साई सूर्य नेत्रसेवाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन महिला व युवतींसाठी विवाहदृष्टीभेट नेत्रशिबिराचे उद्‌घाटन करण्यात आले. महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते हे उद्धाटन पार पडले.

यावेळी जिल्हा रूग्णालयाच्या नेत्रविभाग प्रमुख डॉ. ज्योती मंडे, रोटरी प्रियदर्शनीच्या अध्यक्षा आशाताई फिरोदिया, मीनाताई मुनोत उपस्थित होत्या.

प्रारंभी स्मिरा कांकरिया यांनी स्वागतगीत सादर केले. डॉ. सुधा कांकरिया यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या सोहळ्याची सुरुवात ध्यानधारणेने करण्यात आली. यावेळी महापौर म्हणाल्या, महिला दिनानिमित्त साईसुर्य नेत्रसेवाने जे शिबीर आयोजित केले आहे, त्यामुळे युवती व महिलांना चष्मांपासून मुक्‍ती मिळाली आहे. विवाहाच्या दृष्टीने त्यांच्या कौटुंबिक जीवनही आनंदाचे होण्यास मदत होत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या नेत्र विभाग प्रमुख डॉ. ज्योती मुंडे म्हणाल्या, की गेल्या २१ वर्षापासून साई सुर्यनेत्र सेवा युवती व महिलांसाठी हा उपक्रम सातत्याने राबवत आहे. अत्यधुनिक लेसर नेत्र प्रणाली सामान्यांसाठी त्यांनी उपलब्ध करुन दिली आहे. यावेळी मिना मुनोत, आशा फिरोदिया यांनी मनोगत व्यक्‍त केले. डॉ. प्रकाश कांकरिया यांनी शिबिराची माहिती दिली. डॉ. श्रुतिका कांकरिया यांनी आभार मानले.

या शिबिरात नगरसह औरंगाबाद, लातूर, बीड, जळगाव, पुसद, पुणे, मुंबई, रायगड, अमरावती, नाशिक आदी ठिकाणांहून नेत्ररुग्ण सहभागी झाले होते.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget