728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

अनिल कवडे यांचा उत्‍कृष्‍ट जिल्‍हाधिकारी म्‍हणून मुख्‍यमंत्र्यांकडून गौरव

अहमदनगर । DNA Live24 - नागरी सेवा दिनानिमित्त आज संध्याकाळी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या कार्यक्रमात अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी प्रशासनात विविध आघाड्यांवर केलेल्या उत्कृष्ट  कामाबद्धल त्यांचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन कवडे यांना गौरवण्यात आले. यावेळी वित्तमंत्री सुधीर मूनगंटीवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सुमित मल्लिक आदींची उपस्थिती होती.

सन 2015-16  या वर्षात राबविलेल्‍या पथदर्शी योजना आणि विविध घटकांसाठी कार्यान्वित केलेले विशेष प्रकल्‍पांची दखल घेत जिल्‍हाधिकारी अनिल कवडे यांना राज्‍य सरकारचा उत्‍कृष्‍ट जिल्‍हाधिकारी पुरस्‍कार घोषित झाला आहे. जलयुक्‍त अभियानात श्री कवडे यांना नुकताच शासनाचा राज्‍यस्‍तरावर तिसरा व नाशिक विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्‍कार घोषित झाला. त्‍या पाठोपाठ उत्‍कृष्‍ट  जिल्‍हाधिकारी पुरस्‍कार मिळाला. 

विविध योजनांची उत्‍कृष्‍टतेने व गतीमानतेने अंमलबजावणी करतानाच आपल्‍या प्रभावी वक्‍तृत्‍वाने कवडे यांनी प्रत्‍येक योजनेत लोकसहभाग जलयुक्‍त शिवार, स्‍वच्‍छ भारत, स्‍त्री  भ्रृण हत्‍यासारख्‍या विषयावर  प्रभावी प्रबोधन केले. दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभूमीवर पशुधनास लाभदायी ठरलेला मुरघास प्रकल्‍प, कारागृहाच्‍या सुरक्षिततेसाठी नगर व विसापूर कारागृहास सीसीटीव्‍ही कॅमेरे बसवले.

अंगणवाडीत बालकांच्‍या सुदृढीकरणासाठी  वजन यंत्रे, वॉटरमिटरींग, दारु पिऊन वाहन चालविण्‍यामुळे  होणारे अपघात टाळण्‍यासाठी पोलिस दलास ब्रेथ अॅनॉलायझर आदी विशेष प्रकल्‍प जिल्‍हाधिकारी अनिल कवडे यांच्‍या संकल्‍पनेतून जिल्‍हयात राबविण्‍यात आले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: अनिल कवडे यांचा उत्‍कृष्‍ट जिल्‍हाधिकारी म्‍हणून मुख्‍यमंत्र्यांकडून गौरव Rating: 5 Reviewed By: DNA Live24