History of Maharashtra

अच्छे दिन बघण्यासाठी निरोगी डोळे आवश्यक - तांबटकर

अहमदनगर । DNA Live24 - तंत्रज्ञानाच्या युगात कॉम्प्युटर, मोबाईल व इतर विकसित यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कमी वयात मुलांना यामुळे चष्मे लागायला सुरुवात झाली, हे घातक आहे. कारण तंत्राज्ञाचा वापर हे मानवाच्या भल्यासाठीच आहे, पण त्याचा दुरुपयोग होऊ नये याची आपण दक्षता घेतली पाहिजे, कारण येणारे अच्छे दिन बघण्यासाठी डोळे निरोगी असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रहेमत सुलतान फाऊंडेशनचे अध्यक्ष युनूस तांबटर यांनी केले.

रहेमत सुलतान फाऊंडेशन व राजूभाई मित्र मंडळाच्यावतीने शहीद लेफ्टनंट कर्नल जावेद बकाली यांच्या शहीद दिनानिमित्त के. के. आय. बुधराणी हॉस्पिटलच्या सहकार्याने नेत्र तपासणी व अल्पदरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर रहेमत सुलतान सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी युनूस तांबटकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष अभिजित वाघ, मखदुम सोसायटीचे अनीस शेख, अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाचे कॉ. बहिरनाथ वाकळे, आसिफ दुलेखान, कॉ. महेबुब सय्यद, सलीम भाई, संध्या मेढे, उसमान बकाली, शेख जुबेर, शेख वसीम, आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी तांबटकर म्हणाले, नोटबंदीमुळे मार्केट मध्ये धंदे सुस्त झाले आहे. बँकांकडे देण्यासाठी पुरेसा पैसा नाही एटीएम मध्ये खडखळाट आहे व व्यस्कर व डोळ्यांचे गंभीर आजार झालेली मंडळी यासर्व गोष्टीमुळे डोळ्यांच्या आजार व शस्त्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे ज्यामुळे त्यांचे आजार हे वाढत आहे. अशा परिस्थितीत के. के. आय. बुधराणी सहाय्याने आयोजित केले जाणारे हे शिबीर फार उपयोगी पडत आहे.

समाजात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी असे शिबीर मोठ्या प्रमाणात गावोगावी आयोजित करावे व दुसऱ्यांनाही प्रोत्साहित करावे असे नमूद केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शफाकत सय्यद यांनी केले. तर प्रास्तविक राजुभाई शेख यांनी केले. आभार आबीद दुलेखान यांनी मानले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू मित्र मंडळ, नईम सरदार, मुबीन शेख, शेख फैरोज, शेख तारीक व रहेमत सुलतान फौंडेशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget