History of Maharashtra

मनोरुग्णांच्या त्रासामुळे घोडेगाव ग्रामस्थ हैराण


घोडेगाव । DNA Live 24 (दिलीप शिंदे) - नेवासे तालुक्यातील घोडेगाव ग्रामस्थ तसेच व्यावसायिक सध्या मनोरुग्णांमुळे हैराण झाले आहेत. गावात दर आठवड्याला नविन मनोरुग्ण आल्याचे दिसत अाहे. रात्री - अपरात्री, दिवसाही या मनोरुग्णांच्या वर्तणुकीमुळे ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत.

याबाबत गावातील नागरिकांनी सोनई पोलिस स्टेशनला, ग्रामपंचायतीच्या वतीने एक निवेदन दिले आहे. त्यात शिंगवे तुकाई येथील एक रहिवाशी अनेक दिवसापासून गावात असल्याचे म्हटले आहे. तो मंदिरातील मूर्त्या हलवणे, दर्ग्यावरिल चादर फेकणे, स्त्रिया - मुलींना त्रास देणे, हातात दगड घेऊन दहशत निर्माण करणे, गाड्यावर दगड फेकणे, कपडे, भांडी, चपला वगैरे उचलून नेण्याचे प्रकार करत असल्याचे म्हटले अाहे.

अशा मनोरुग्णांचा बंदोबस्त करणाच्या मागणीचे निवेदन गुरूवारी (३० मार्च)  सोनई पोलिस स्टेशनला देण्यात आले. या निवेदनावर ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी सुनील शेलार, कामगार पोलिस पाटिल - बाबासाहेब वैरागर, स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्राचे अध्यक्ष एकनाथ जाधव, विजय अशोक नहार, कार्तिकी संतोष सोनवणे, तनुश्री मल्हारी कदम, साक्षी दिनकर घाडगे यांसह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत .

सोनई पोलिस स्टेशनचे बिट हवालदार विश्वनाथ गोल्हार यांच्याशी संपर्क केला असता, मनोरुग्नांचे नातेवाईकच त्याला दवाखान्यात अगर इतर ठिकाणी नेऊ शकतात. आम्ही काही करू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान अशा मनोरुग्णांमुळे गावात काही अनुचित प्रकार घडला, तर त्याला जबाबदार कोण ? मनोरुग्णांचे नातेवाईक की पोलिस प्रशासन ? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget