History of Maharashtra

अक्षयतृतीया निमित्त रिमांड होमला किराणा वस्तूंची भेट

अहमदनगर । DNA Live24 - वंचितांसमवेत सण, उत्सव व वाढदिवस साजरा करण्यात खरा आनंद व समाधान मिळतो. इतर प्रचलित पध्दतीने सेलिब्रेशन करण्यापेक्षा सामाजिक भावनेने उपेक्षितांना केलेली मदत प्रेरणादायी आहे. अक्षयतृतीयाच्या मुहुर्तावर रिमांड होममध्ये घेण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

श्रीमंतयोगी प्रतिष्ठाण, महाराज ग्रुप, व फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने अक्षयतृतीया निमित्त रिमांडहोममधील मुलांसाठी किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी आनंद सुरसे, योगेश सुरसे, जालिंदर बोरुडे, पवन भिंगारे, आकाश भिंगारे, महेश सुरसे, वैभव वाघ, युवराज ढगे, शेखर नागुल, अतुल कावळे, संदीप खरात, सागर चव्हाण, सोमनाथ चितळकर, मयुर ढगे, अक्षय सोनवणे, पवण दाणे, सनी जाधव, प्राजक्ता जोशी, दुर्गा सादूल उपस्थित होते.

तसेच रेखा जाधव, पौर्णिमा माने, प्रा. ढेरे, चेतन नागुल, राहुल सारसर, रोहित सारसर, मनोज कापसे, ओंकार नागुल, देवेंद्र देशमुख, सनी विधाते, सोनू राणा, रजनीश वाघ, संतोष भिंगारदिवे हेही उपस्थित होते. प्रा. आनंद सुरसे यांनी सर्व अनावश्यक खर्चांना फाटा देवून, आपला वाढदिवस रिमांड होममधील मुलांसमवेत साजरा केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रिमांड होमच्या सुलोचना कालापहाड यांनी केले. आभार जालिंदर बोरुडे यांनी मानले.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget