History of Maharashtra

पदाधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे महापालिकेची अवस्था बिकट - आमदार जगताप

अहमदनगर । DNA Live24 - महापालिका ही काही बँक नव्हे, ती जनतेचे प्रश्‍न सोडविणारी संस्था आहे. परंतु महापालिकेतील पदाधिकारी ठेकेदारांकडून व अधिकाऱ्यांकडून 15 ते 20 टक्क्याने पैसे घेण्याचा सपाटा लावला आहे. अधिकाऱ्यांनी बोगस कामाचे चेक न काढल्यास त्यांना मारण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. परंतु एमएसईबीने महापालिकेच्या पाणीपुरवठ्याची लाईट तोडली, ही महापालिकेची खेदजनक बाब आहे. आमच्या काळात कधीही असे प्रकार पाहायला मिळाले नाहीत. या टक्केवारीमुळे महापालिकेची अवस्था बिकट झाली आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

प्रभाग 2च्या नगरसेविका रूपाली वारे यांच्या प्रयत्नातून संदेशनगर येथील सभामंडपाचा लोकार्पण सोहळा आमदार जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, सुजित खरमाळे, आदिनाथ लवांडे, गणेश गोरे, विद्या भोपे, कैलास नाकाडे, अविनाश पवार, साहेबराव आघाव, अनिल निमसे, राहुल घाणेकर, सुदाम रक्ताटे, अनिता गोरे, कुसूम नाकाडे, मंदाकिनी गोरे, सुनील त्रिंबके, अलका गडकर, गोपाळ गोरे, रवी तांदळे आदी उपस्थित होते.

यावेळी जगताप म्हणाले, शहरातील जनतेला आता विकासाची आस लागली आहे. त्यामुळे जनता आता विकासाबरोबर आली आहे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल. चांगल्या विचाराचे लोक सत्तेत आले पाहिजेत. पैसे कमावणाऱ्या येणाऱ्यांना जनताच घरी बसवील. शहरात कधीही पक्षीय राजकारण केले नाही. सर्व पक्षाच्या लोकांना बरोबर घेऊन विकासाची मोट बांधण्याचे काम मी करीत आहे, असे ते म्हणाले.

निखील वारे म्हणाले, आमदार जगताप हे शब्दाला पाळणारे आहेत. विकास काय असतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी सभा मंडपाचे काम पूर्ण करून दिले. ज्याला धार्मिक वारसा आहे हेच लोक विकासकामे करू शकतात. विरोधक धार्मिकतेचा राजकारणासाठी वापर करतात. प्रभागातील जनतेने आम्हाला दोनदा नगरसेवक करण्याचा मान दिला. त्यामुळेच आम्ही प्रभागामध्ये विकासकामे करू शकलो.

विकासात लोकांचा सहभाग असणे गरजेचे आहे. जनतेचे प्रश्‍न मागील लोकप्रतिनिधीने सोडवत नसल्याने जनतेचा विश्‍वास लोकप्रतिनिधीवरून उडाला. मात्र, आमदार संग्राम जगताप यांनी विकासकामे करून जनतेचा विश्‍वास संपादन केला. इतर लोकप्रतिनिधींनी आम्हाला सभामंडपासाठी शब्द दिला परंतु आजतागायत त्यांचे कुठलेही काम या भागात झाले नाही, असे ते म्हणाले.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget