728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

करीम शहावली बाबा दर्गाचा संदल उत्साहात

अहमदनगर । DNA Live24 - नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे करीमशहा वली बाबा दर्गाचा संदल उरुस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संदल उरुस निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कव्वाली कार्यक्रमात मुंबई येथील कलाकारांनी एकापेक्षा एक सरस कव्वाली सादर करुन उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.

संदल उरुस निमित्त पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, पारनेर शिवसेना प्रमुख निलेश लंके, उरुसचे आयोजक राजूभाई शेख, माजी सरपंच अरुण कापसे, मुस्ताक शेख, नेहरु युवा केंद्र संलग्न स्व. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे, दिलीप शेख, सलीम शेख, शाहरुख शेख, भरत बोडखे आदिंसह गावतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील श्रीबिरोबा महाराजांच्या यात्रेच्या समारोपा नंतर गावात दोन दिवस करीमशहा वली बाबाचा संदल उरुस साजरा केला जातो. यात्राउत्सव व संदल उरुसमध्ये सर्वधर्मिय भाविक सहभागी होवून, गावात धार्मिक ऐक्य जपले आहे. संदल निमित्त फकिरांनी जरब लावले असता त्यांना पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दर्गाला आकर्षक फुलांची व विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली आहे. महाप्रसादाने उरुसाची सांगता झाली.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: करीम शहावली बाबा दर्गाचा संदल उत्साहात Rating: 5 Reviewed By: DNA Live24