728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

नऊ पोलिस निरीक्षकांच्या नगर जिल्ह्याबाहेर बदल्या

अहमदनगर । DNA Live24 - जिल्हा पोलिस दलातील ९ पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. दोघांनी जिल्ह्यातील सेवाकाळ पूर्ण केल्यामुळे तर उर्वरित ७ जणांच्या विनंतीनुसार बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या जागी ९ पोलिस निरीक्षक नव्याने जिल्हा पोलिस दलात दाखल होत आहेत. त्यापैकी चौघांचा आधीच्या ठिकाणी सेवाकाळ पूर्ण झाल्यामुळे तर ५  जणांची विनंतीनुसार नगर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. 

कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर यांची मुंबई शहरात, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक इरफान गुलाब शेख यांची जि. ज. प्र. प. स. विभागात धुळ्याला बदली झाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे माजी पोलिस निरीक्षक (सध्या नेमणूक नियंत्रण कक्ष) शशिराज गुंडोपंत पाटोळे यांची कोल्हापूरला, पांगरमल प्रकरणामुळे नियंत्रण कक्षात बदली केलेले रविंद्र देविदास निकाळजे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात, नंदकिशोर माधव शेळके यांची औरंगाबादला बदली झाली आहे.

दिपककुमार चुडामणराव वाघमारे यांची नाशिकच्या पोलिस अकादमीत बदली झाली आहे. कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी पर्वतराव गवारे यांची राज्य नियंत्रण शाखेत बदली झाली आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अजित लकडे यांची पुणे शहरात, तर जिल्हा विशेष शाखेतील पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे. या चारही पोलिस निरीक्षकांच्या बदल्या विनंतीनुसार करण्यात आल्या आहेत. गवारे हे कोपर्डी बलात्कार प्रकरणात तपासी अधिकारी आहेत.

जिल्ह्यात नव्याने आलेले पोलिस निरीक्षक - (कंसात आधीचे नियुक्तीचे ठिकाण)- सुनिल पवार (पुणे शहर), प्रसाद शंकर गोकुळे (गुन्हे अन्वेषण विभाग), वसंत महादू पथवे (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग), नंदकुमार दामोदर साबळे (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग), राजेंद्र धर्माजी चव्हाण (पुणे शहर), अविनाश शंकरराव शिळीमकर (नागपूर), बाजीराव महादेव पोवार (नागपूर शहर), अभय मुकुंदराव परमार (लोहमार्ग पुणे) व दौलत शिवराम जाधव (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग). हे सर्वजण नव्याने जिल्ह्यात दाखल होत आहेत.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: नऊ पोलिस निरीक्षकांच्या नगर जिल्ह्याबाहेर बदल्या Rating: 5 Reviewed By: DNA Live24