History of Maharashtra

मारहाण करुन लुटणाऱ्या दोघांना १० वर्षे सक्तमजुरी

अहमदनगर । DNA Live24 - भाड्याने घेतलेल्या वाहनाच्या चालकाला मारहाण करुन लुटल्याप्रकरणी दोन आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले. या दोघांनाही प्रत्येकी १० वर्षांची सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी गुरुवारी दुपारी हा निकाल दिला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. अनिल व्ही. सरोदे यांनी काम पाहिले.

अभिलेष शंकर पटेल (वय २२) व निलेश रावसाहेब शिंदे (वय २६, दोघेही रा. कर्जत, ता. शहादा, जि. नंदूरबार) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. हा प्रकार ऑगस्ट २०१५ मध्ये नगर पुणे महामार्गावर सुपा परिसरात घडला होता. अभिलेष पटेल व निलेश शिंदे यांनी येरवडा परिसरातील विमानतळावर प्रविण गुंडाप्पा (रा. मुंडवा, पुणे) यांची स्विफ्ट डिझायर कार नगरला येण्यासाठी भाड्याने घेतली. रस्त्यात लघुशंकेचा बहाणा करुन त्यांनी कार थांबवायला लावली.

पळवे खुर्द शिवारात कार थांबताच आरोपींनी प्रविणच्या हातावर चाकूने वार करुन त्याला जखमी केले. नंतर त्याचे हातपाय बांधून वाघुंडे गावात पुलाखाली टाकून दिले. नंतर कार व प्रविणजवळ असलेली रोकड चोरुन दोघे आरोपी पसार झाले. याप्रकरणी प्रविणने दिलेल्या फिर्यादीवरुन सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. फौजदार एस. आर. गोरे यांनी आरोपींना अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्यात अॅड. अनिल सरोदे यांनी सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासले. फिर्यादी प्रविण, तपासी अधिकारी फौजदार गोरे यांच्यासह काही साक्षी महत्वाच्या ठरल्या. खटल्यातील साक्षीपुरावे व अॅड. सरोदे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने अभिलेष पटेल व निलेश शिंदे यांना दोषी ठरवले. जबरी चोरीप्रकरणी दोघांनाही १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget