History of Maharashtra

राजकारण बाजूला ठेवून विकासाला सहकार्य करा - माधव लामखडे


अहमदनगर । DNA Live24 - निंबळक गटातील विकासात्मक कामे मार्गी लावण्यासाठी नियोजनात्मक आराखडा तयार करण्यात आला आहे. जनतेने टाकलेल्या विश्‍वासाची उतराई, विकासात्मक कामाने केली जाणार असून, पहिल्याच वर्षी मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे मार्गी लावू. गावासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य माधव लामखडे यांनी केले.

नगर तालुक्यातील निंबळक ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य माधव लामखडे यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहिर नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब लामखडे तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इसळकचे सरपंच पोपटराव खामकर, भाऊसाहेब गेरंगे, दत्ता सप्रे, बाळासाहेब साठे, आदम पटेल, केतन लामखडे, दादा साठे, माजी सरपंच विलास लामखडे, राजू रोकडे, आदी उपस्थित होते.

लामखडे म्हणाले, काही विरोधक गावकऱ्यांना दिशाभुल करण्याचा प्रयत्न करुन, विकासात्मक कार्यामध्ये खोडा घालत आहेत. पाणी प्रश्‍नावर गावाचा नांव बदनाम करण्याचे षडयंत्र चालू आहे. स्व. संजय लामखडे यांनी निंबळकच्या ग्रामस्थांना मीटरद्वारे घराघरात पाणी पोहचविले. पाणी वाटपाचे नियोजन सुरळीत करण्यासाठी थकित पाणीपट्टी धारकांचे नळ कनेक्शन पोलिस बंदोबस्तात कट करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

विलास लामखडे म्हणाले, निंबळकने मीटर पध्दतीची आदर्शवत योजना संपुर्ण जिल्ह्याला दिली असून, पाणी प्रश्‍ना संदर्भात योग्य नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. संजय बाचकर यांनी विधान सभेत लामखडे यांना पाठविण्यासाठी ग्रामस्थांनी लोकचळवळ उभी करण्याची गरज आहे. स्थानिक ग्रामस्थांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी गावात संपर्क कार्यालय उभारण्याची आग्रही मागणी सुनिल जाजगे यांनी केली. सुत्रसंचलन दादा कोतकर यांनी केले. आभार केतन लामखडे यांनी मानले.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget