728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

खाेसपुरी शिवारात अनोळखी पुरुषाचा मृतदेह

काल्पनिक रेखाचित्र

अहमदनगर । DNA Live24 - अनोळखी व्यक्तीचा खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह एका पडीक शेतात टाकला. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली आहे. नगर-औरंगाबाद हायवेलगत खोसपुरी शिवारात बानकर यांच्या शेतात प्रेत आढळले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी व वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनासह पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

औरंगाबाद हायवेलगत एमआयडीसीशेजारी रशिद सरदार शेख याचे पवन नावाचे हॉटेल आहे. गुरूवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास हॉटेलसमोर शेतामध्ये त्याला एक मृतदेह पडलेला दिसला. त्याने पोलिस पाटील अंबादास देवकर यांना बोलावले. दोघांनी पाहिले असता प्रेत जळालेल्या अवस्थेतील पुरुषाचे होते. काही वेळातच एमआयडीसीचे सहायक निरीक्षक विनोद चव्हाण सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त अधीक्षक घनश्याम पाटील, नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे हेही पथकासह घटनास्थळी आले. बानकर यांच्या शेतात ३५ ते ४० वयोगटाचे पुरुषाचे प्रेत होते. त्याचा चेहरा ज्वलनशील पदार्थ टाकून जाळलेला होता. गुलाबी रंगाच्या शर्टने गळा आवळला होता. पॅँटने दोन्ही हात बांधलेले होते. अंगात पांढऱ्या रंगाची अंडरवेअर व हाफ बनियान होते. जवळ पॅरागॉन चप्पल व देशी दारुच्या दोन बाटल्या होत्या. मृताच्या कमरेला लाल रंगाचा करगोटा होता.

त्याच्या डाव्या हातावर हृदयाच्या आकारामध्ये आर. एम. असे गोंदलेले होते. याप्रकरणी पोलिस पाटील देवकर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण करीत आहेत. पोलिसांनी मृताचे रेखाचित्र जारी केले असून नागरिकांना त्याबद्दल माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
मृतदेह पडीक शेतामध्ये आणून टाकण्यापूर्वीच त्याचा गळा आवळून खून केलेला होता. नंतर त्याची ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्यात आले. नंतर हा मृतदेह खोसपुरी शिवारामध्ये आणून टाकण्यात आला. याबद्दल कोणाला माहिती असल्यास एपीआय विनोद चव्हाण यांनी ९०११०९०९७५ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: खाेसपुरी शिवारात अनोळखी पुरुषाचा मृतदेह Rating: 5 Reviewed By: DNA Live24