History of Maharashtra

जलयुक्त शिवाराच्या कामात लोकसहभाग आवश्यक

राहुरी । DNA Live24 -  जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेली सिमेंट नालाबांध, कंपार्टमेंट बंडीग ही कामे भविष्यासाठी वरदान ठरणार आहेत. त्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याची अपेक्षा जिल्हाधिकारी डाॅ. अभय महाजन यांनी व्यक्त केली.

राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे परिसरात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सुरू असलेल्या कामाची जिल्हाधिकारी महाजन यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या.जलयुक्त शिवाराच्या या कामांमुळे गाव शिवारातील पाणी पातळी तसेच सिंचन क्षमता वाढण्यासाठी मदत होणार असल्याचे महाजन म्हणाले.

कृषी विभागाच्या ग्रामीण रोहयो अंतर्गत राबविलेल्या शेततळे, गांडुळखत डेपो, नॅडप कंपोष्ट, डाळिंब फळबाग लागवड या ठिकाणांची जिल्हाधिकारी महाजन यांनी पाहणी केली. 

यावेळी जिल्हा कृषी अधिकारी पंडीत लोणारे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. लोखंडे, लघुपाटबंधारे उपअभियंता गायसमुद्रे, चिंचविहीरे गावच्या सरपंच शांताबाई गिते, पोलीस पाटील हिराबाई नरोडे, ग्रामपंचायत सदस्य, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते. 
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget