728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

नागरिकांनीच दर्जेदार कामांसाठी दक्ष रहावे

अहमदनगर । DNA Live24 - प्रभाग पंधरामधील कराचीवालानगर भागातील एकूण सहा रस्त्यांचे प्रथम मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येईल. रस्त्याचे काम अधिक दर्जेदार होण्यासाठी स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जय भोसले यांनी आपणाकडे मागणी केली होती. ही मागणी आपण गरज ओळखून पूर्ण केली, असे आमदार संग्राम जगताप म्हणाले.

प्रभाग 15मधील कराचीवालानगर रस्त्याचे आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येत असून, या रस्त्याची आ. जगताप, तसेच नगरसेवक आरिफ शेख, जय भोसले, हितेश पटवा, धिरज डागा, आकाश डागा, राजेंद्र डागा, संजय साळवे, महेश बोरा, रजत दायमा यांनी पाहणी केली. यावेळी आमदार जगताप बोलत होते. यावेळी आमदार जगताप म्हणाले की, बरेच दिवसांपासून स्थानिक नागरिकांची हे रस्ते करावेत, अशी मागणी होती.

या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, त्यानुसार निधी उपलब्ध करून दिला. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा परिसर अधिक आकर्षक दिसू शकेल, असे सांगितले. जय भोसले म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या भागातील प्रश्‍न सोडविण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. आमदार निधीतून शहरात विकासात्मक कामे सुरू आहेत, याचा विशेष आनंद वाटतो.

नगरसेवक आरिफ शेख म्हणाले की, शहरात आमदार निधीतून अनेक विकासकामे झाली आहेत. ती आपणा सर्वांसमोर आहेत. शहराच्या विकासाला त्यांच्यामुळेच गती मिळाली आहे. पक्षपातीपणा न करता त्यांनी सर्वांना निधी दिला आहे, असे ते म्हणाले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: नागरिकांनीच दर्जेदार कामांसाठी दक्ष रहावे Rating: 5 Reviewed By: DNA Live24