728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

कलकत्ता चित्रपट महोत्सवात नगरच्या "डार्क ब्लॉसम'चा गौरव

अहमदनगर । DNA Live24 - नगरचे प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीपाद दगडे लिखित व प्रथमच दिग्दर्शित चित्रपटाचा नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मानाच्या पुरस्काराने गौरव झाला. कलकत्ता येथे आयोजित "कलकत्ता कल्ट फिल्म फेस्टिव्हल'मध्ये त्यांच्या "डार्क ब्लॉसम' सिनेमाला "आऊटस्टँडिंग अचिव्हमेंट' पुरस्काराने गौरवण्यात आले.

या सिनेमहोत्सवात इटली, रोमेनिया, हंगेरी, जपान, अमेरिका, दक्षिण अफ्रिका आदी देशांतील सिनेमांचा सहभाग होता. दिग्दर्शक श्रीपाद दगडे यांनी लिहिलेला दिग्दर्शित केलेला त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी "भिडू' या चित्रपटाची निर्मिती व छायाचित्रण केलेले आहे. "डार्क ब्लॉसम' या चित्रपटाची निर्मिती नगरचे व्यावसायिक अमोल जवरे यांनी केली आहे.

या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात जागतिक सिनेमात प्रथमच वेगळ्या प्रकारे रंगसंगती वापरण्यात आली आहे. स्त्री-पुरुष समानतेवर भाष्य करणारा चित्रपट असल्याने नामावलीच आईचे व वडिलांचे नाव समाविष्ट केलेले आहे. एकाच खोलीत बंदिस्त झालेले दोन वयोवृद्ध म्हातारे, या सूत्राभोवती सिनेमाचे कथानक फिरते. या भूमिका नगरचे प्रख्यात कलावंत अच्युत देशमुख व मीना देवधर यांनी साकारल्या आहेत.

या चित्रपटात नाना मोरे, विजय दळवी, महेश काळे यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय सारंग देशपांडे, सचिन दरवडे, विपुल महापुरूष, अक्षय देशपांडे, शरद सुद्रिक, आबा सैंदाणे, अजेय मिरीकर, रोहित देवगावकर, महेश दळे, सायली बार्शिकर, प्रशांत गुळवे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली आहे.

या चित्रपटाचे छायाचित्रण अहमदनगर व गुहागर येथे झाले. त्यासाठी गोपाळराव मिरीकर, सतीश डांगे, मकरंद खेर, रविंद्र व्यवहारे, अशोक अकोलकर, यांचे सहकार्य लाभले. आगामी वर्षामध्ये आयोजित होत असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा सिनेमा दाखवला जाणार आहे, असे दिग्दर्शक श्रीपाद दगडे यंानी सांगितले आहे. 
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: कलकत्ता चित्रपट महोत्सवात नगरच्या "डार्क ब्लॉसम'चा गौरव Rating: 5 Reviewed By: DNA Live24