728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

ज्ञानेश्वरच्या कामगारांना १५ टक्के वेतनवाढ

नेवासे । DNA Live24 - ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना १ मेपासून १५ टक्के वेतनवाढ लागू होणार आहे. हा निर्णय ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार नरेंद्र घुले यांनी जाहीर केला आहे. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने कामगारांना त्रिपक्ष समितीच्या करारानुसार ही वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला.
 
डिसेंबर २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक व  फेडरेशनचे सरचिटनीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली साखर कामगारांना 40 टक्के वेतनवाढ मिळावी, यासाठी साखर आयुक्तालयावर मोर्चा व धरणे आंदोलन केले होते. त्याच दिवशी लगेच १५ टक्के वेतनवाढ देण्याबाबत त्रिपक्ष समितीचा निर्णय झाला होता.

साखर संघ व कामगार आयुक्तांनी वेतनवाढ लागू करण्याचे आदेश राज्यातील सर्व साखर कारखान्यांना दिलेले आहेत. कामगार संघटनेचे सरचिटणीस नितीन पवार यांनी कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक  माजी आमदार नरेंद्र घुले, अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, जेष्ठ संचालक अॅड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, काशिनाथ नवले, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यावस्थापक काकासाहेब शिंदे  यांचेकडे वेतनवाढ लागू करण्याची मागणी केली होती.

या मागणीला माजी आमदार नरेंद्र घुले व संचालक मंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मारुतराव घुले यांचे विचाराचा वारसा जपत ज्ञानेश्वर साखर कारखान्याने सदैव शेतकरी, कष्टकरी व कामगारांचे हित जोपासले आहे. हीच परंपरा पुढील काळातही सुरूच राहिल, अशी प्रतिक्रिया माजी आमदार नरेंद्र घुले यांनी  दिली.

कामगारांना १५ टक्के वेतनवाढ लागू केल्याबद्ल कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार नरेंद्र घुले, अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, जेष्ठ संचालक अॅड देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, काशिनाथ नवले, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे व संचालक मंडळ यांचे  कामगार संघटनेचे सरचिटणीस नितीन पवार, उपाध्यक्ष भाऊसाहेब चौधरी, सेक्रेटरी जनार्दन कदम सर्व कामगारांनी आभार व्यक्त केले आहेत.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: ज्ञानेश्वरच्या कामगारांना १५ टक्के वेतनवाढ Rating: 5 Reviewed By: DNA Live24