728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

सराईत डंपरचोर अवघ्या ५ तासांत जेरबंद

अहमदनगर । DNA Live24 - वाळूचोरी करण्यासाठी डंपरची चोरी करुन पसार झालेल्या वाहनचालकाला एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने पाठलाग करुन पकडले. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली. सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास डंपर चोरीला गेला होता. पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सात तासांतच डंपरसह चोरट्याला पकडले.

नाना दादा आगे (रा. राहाता) असे आरोपीचे नाव आहे. स्वप्निल अशोक ढवण (वय ३०, रा. तपोवन रोड, नगर) यांचा भोलेनाथ सप्लायर्स व ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीचा टाटा कंपनीचा डंपर (क्र. एमएच १६ एएम ५००७) सोमवारी रात्री पोखर्डी शिवारातून चोरीला गेला. त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. एमआयडीसीचे सहायक निरीक्षक विनोद चव्हाण यांनी वेगाने तपासाची सूत्रे फिरवित १५ लाख रुपये किंमत असलेल्या डंपरचा माग काढला.

काही तासांतच आरोपी आगेच्या मुसक्या आवळल्या. स्वप्निल ढवण यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात वाहनचाेरीची फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नाना आगे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. त्याने यापूर्वीही काही वाहने चोरली असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. चोरलेल्या वाहनाचा क्रमांकही त्याने काही वेळातच बदलला होता. चोरीची वाहने वाळूतस्करीकरिता वापरायचा त्याचा मनसुबा होता. तो एमआयडीसी पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: सराईत डंपरचोर अवघ्या ५ तासांत जेरबंद Rating: 5 Reviewed By: DNA Live24