History of Maharashtra

अहमदनगरच्या पर्यटनाला चालना देऊ - जिल्हाधिकारी

शहर स्थापनादिनी बागरोजात प्रेस क्लबतर्फे वृक्षरोपण

शहराचे संस्थापक अहमद निजामशाह यांना श्रध्दांजली

अहमदनगर । DNA Live24 - ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धन व विकासाचा मुद्देसुद आराखडा बनवून, शहराच्या पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तत्पुर्वी यासाठी जाणकार व्यक्ती व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेतली जाणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी केले.

अहमदनगर शहराच्या 527 व्या स्थापना दिनानिमित्त अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने शहराचे संस्थापक अहमद निजामशाह यांच्या बागरोजा हडको येथील कबर स्थळी आयोजित केलेल्या श्रध्दांजली कार्यक्रमास दुपारी जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी भेट देवून, चादर अर्पण केली यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, जिल्हा नियोजन अधिकारी सुर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह होलम, भूषण देशमुख, महेश महाराज देशपांडे, समीर मन्यार, दिपक रामदिन आदिंसह पत्रकार, वृत्तछायाचित्रकार व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बागरोजा येथील ऐतिहासिक वास्तुंची माहिती जिल्हाधिकारी महाजन यांनी जाणून घेतली. इतिहासकार भुषण देशमुख यांनी या वास्तुची व शहराच्या इतिहासाबद्दलची माहिती दिली. मन्सूर शेख यांनी जिल्हाधिकारी महाजन यांना शहराच्या पर्यटन स्थळांची माहिती पुस्तिका भेट देवून स्वागत केले.

अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती महेश महाराज देशपांडे यांनी दिली. बागरोजा परिसरात जिल्हाधिकारी महाजन यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget