History of Maharashtra

जय युवा अ‍ॅकॅडमीला आदर्श युवा संस्था पुरस्कार


अहमदनगर । DNA Live24 - जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने दिला जाणारा जिल्हा आदर्श युवा संस्था पुरस्कार जय युवा अ‍ॅकॅडमीस पोलिस मुख्यालय येथील महाराष्ट्र दिनाच्या शासकिय कार्यक्रमात देण्यात आला. पालकमंत्री राम शिंदे यांनी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे व सचिव जयश्री शिंदे यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व 50 हजार रुपयांचा धनादेश देवून संस्थेच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी उपस्थित होते. सामाजिक, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, क्रीडा, युवा जागृती व महिला सक्षमीकरणासाठी संस्थेचे जिल्ह्यात कार्य सुरु आहे. जय युवा अ‍ॅकेडमी गेल्या 11 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. गरजू, विधवा, घटस्फोटीत, अपंग, अर्धवट शिक्षण झालेले, युवती व महिलांसाठी सातत्याने स्वयंरोजगार निर्मितीचे कार्य करत आहे.

युवकांचे संघटन करुन त्यांना सामाजिक विधायक उपक्रमात आनण्यासाठी प्रयत्न करीत आहे. विविध आरोग्य तपासणी शिबीर, जनजागृतीपर उपक्रम, गरोदर महिलाची तपासणी, लेक वाचवा अभियान, बालआरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर आदि उपक्रम खाजगी वैद्यकिय व्यावसायिक, मनपा व जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सहकार्याने संस्थेच्या वतीने घेण्यात आले. आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांना सामाजिक कार्यात सहभागी करुन, ग्रामीण भागात संस्था प्रभावीपणे कार्य करत आहे.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget