History of Maharashtra

हायटेक पद्धतीने वाहनचोरी करणारे जेरबंद


अहमदनगर । DNA Live24 -  ओळखीच्या लाेकांच्या गाडीचा कोड मिळवून लॉक तोडून वाहनचाेरी करणाऱ्या टोळीतील दोघांना पोलिसांनी जेरबंद केले. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त अधीक्षक घनश्याम पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली. आरोपींकडून पोलिसांनी ६ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ही वाहने त्यांनी नगर व पुणे जिल्ह्यातून चोरल्याची कबुली दिली आहे.

सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, शरद गोर्डे, पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, मन्सूर सय्यद, पोलिस नाईक अण्णा पवार, भागिनाथ पंचमुख, राहुल हुसळे, सुरज वाबळे, विनोद मासाळकर, बाळासाहेब भोपळे, सचिन कोळेकर यांनी ही कामगिरी केली. एक संशयित युवक चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी तारकपूर बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तारकपूर परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

अभिषेक स्टिफन साळवे (रा. शांतीपूर, तारकपूर) व आकाश शिवाजी नाकाडे (रा. निपाणी जळगाव, पाथर्डी) असे आरोपी युवकांचे नाव आहे. त्यांच्याकडे एफझेड मोटारसायकलवर मिळाली. तिचा नंबर बनावट असून सुडके मळ्यातून ती चोरल्याचे त्यांनी सांगितले. अधिक चौकशीअंती त्यांनी तारकपूर, पिंपरी चिंचवड व सांगवी (जि. पुणे), संत अण्णा चर्च, सुडके मळा भागातून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सहा वाहने जप्त करण्यात आली.

जप्त केलेल्या वाहनांमध्ये दोन यामाहा एफझेड, एक बजाज पल्सर २२० सीसी, एक बजाज पल्सर १८० सीसी, एक होंडा सीडी डीलक्स, एक बजाज डिस्कव्हरचा समावेश आहे. या वाहनांची एकूण किंमत सुमारे ३ लाख आहे. याप्रकरणी कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्यात वाहनचोरीच्या गुन्ह्याची नोंद होती. त्यामुळे त्यांना कोतवाली व तोफखाना पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

नवी शक्कल - मुख्य आरोपी अभिषेक साळवे हा ओळखीच्या लोकांची, घराजवळ उभ्या असलेल्या गाडीच्या चावीचा कोड नंबर मिळवायचा. नंतर शो रूममध्ये जाऊन गाडी चोरीला गेले, असे खोटे सांगायचा. त्याआधारे बनावट चावी बनवून गाडी चोरायचा. चोरलेली गाडी अगदी किरकोळ किमतीला विकत असे, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget