728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

कांदा व्यापाऱ्याच्या घरात एक कोटींच्या जुन्या नोटा


अहमदनगर । DNA Live24 - शहरातील एका कांदा व्यापाऱ्याकडून पोलिसांनी सुमारे १ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या. नोटाबंदीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा जप्त करण्याची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. संजय नामदेव शेलार असे व्यापाऱ्याचे नाव आहे. सावेडीतील संत नामदेव नगरमध्ये त्याच्या बंगल्यात रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी शेलारला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

शेलार हा कांदा व बटाट्याचा व्यापारी असून संत नामदेव नगरमध्ये बायजाबाई सोसायटीत राहतात. त्यांच्याकडे जुन्या नोटा असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना दिली होती. त्यानुसार अॅडिशनल एसपी घनश्याम पाटील, सिटी डीवायएसपी अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रविवारी सकाळी साडेसात वाजताच शेलारच्या घरात छापा टाकला.

घराच्या झडतीमध्ये एका बॅगेमध्ये भारत सरकारने चलनातून बाद केलेल्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटा आढळल्या. पोलिसांनी या नोटा जप्त केल्या. एक हजारांच्या नोटांची रोकड ६० लाख २६ हजार, तर पाचशेच्या नोटांची रक्कम ३९ लाख ७२ हजार ५०० इतकी होती. एकूण ९९ लाख ९८ हजार ५०० रुपये जप्त केले.  तोफखाना पोलिसांनी नोटांचा पंचनामा करुन शेलारला चौकशीकरिता ताब्यात घेतले.

शेलारच्या पाठीमागे आता आयकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लागणार आहे. तोफखान्याचे पोलिस निरीक्षक नारायण वाखारे, भिंगार कॅम्पचे एपीआय कैलास देशमाने, एलसीबीचे एएसआय कृष्णा वाघमारे, पोलिस नाईक विश्वास गाजरे, संजय चोरडिया, दिपक रोहोकले, भास्कर गायकवाड, संजय काळे, नितीन भताने, हरुन शेख, जगताप, सोनवणे, गवांदे, यांच्या पथकाने ही कारवाई केली.
भारत सरकारने एक हजार व पाचशे रुपयांचा नोटांवर बंदी आणल्यानंतर या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी मुदत दिली होती. त्यानंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्यामुळे पोलिसांनी त्या रीतसर जप्त केल्या आहेत. आयकर विभागाच्या चौकशीनंतर याप्रकरणी पुढील कारवाई होईल. - रंजनकुमार शर्मा, एसपी, अहमदनगर.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: कांदा व्यापाऱ्याच्या घरात एक कोटींच्या जुन्या नोटा Rating: 5 Reviewed By: DNA Live24