728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

नाशिकमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट

नाशिक l DNA Live24 - नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळख असणाऱ्या कॉलेजरोडवरील हॉलमार्क चौकातील एक्झोटिक स्पा नावाच्या मसाज पार्लरवर आज दुपारी पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला देहविक्रीचा व्यवसाय पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे.

या छाप्यात 8 मुली आणि 5 मुलांना ताब्यात घेण्यात आलं. अनेक दिवसांपासून या ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरु असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या सर्व 13 जणांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्यावर गंगापुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याच काम सध्या सुरु आहे. या स्पा सेंटरमागे एक हायप्रोफाईल रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे बिवायके-आरवायके कॉलेजपासून हाकेच्या अंतरावरच असलेल्या या पार्लरमध्ये हा सर्व प्रकार सुरु होता, यापूर्वी देखील या स्पा सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली होती, मात्र तरीही पुन्हा स्पा सेंटरच्या आड देहविक्री कशी सुरू झाली हा सध्या नाशकात चर्चेचा विषय ठरतो आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: नाशिकमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट Rating: 5 Reviewed By: DNA Live24