728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

'रेडिओ सिटी'च्या सायकल रॅलीद्वारे पर्यावरण जनजागृती

अहमदनगर । DNA Live24 - शहराच्या 527 व्या स्थापना दिनानिमित्त रेडिओ सिटी, नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक व सी. ए. असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता व पर्यावरण जनजागृतीवर सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीस नगरकरांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीमध्ये सहभागी  अबाळवृध्दांनी नगरकरांना स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते प्रोफेसर कॉलनी चौक येथून सायकल रॅलीस प्रारंभ करण्यात आला. रंजनकुमार शर्मा म्हणाले की, शाररीक व पर्यावरणाच्या आरोग्यासाठी सायकल हा उपयुक्त पर्याय आहे. वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असून, नागरिकांनी पर्यावरण संतोलन राखण्यासाठी सायकल वापराचा संकल्प करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या प्रमुख मार्गावरुन सायकल रॅलीचे मार्गक्रमण होवून, वाडियापार्क क्रीडा संकुल येथे समारोप झाले.

नगर अर्बन बँकेचे संचालक अनिल कोठारी व सी.ए. असोसिएशनचे प्रसाद भंडारी यांच्या हस्ते छत्रपती पुरस्कार विजेता सायकलिंग खेळाडू सतीष झेंडे, हरीयाली संस्थेचे सुरेश खामकर, छाया रजपूत, वृत्तपत्र विक्रेते व कुरिअर डिलेव्हरी बॉय यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर.जे. चैत्राली व आशुतोष यांनी केले. आभार ओंकार थोरात व धनेश खत्ती यांनी मानले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: 'रेडिओ सिटी'च्या सायकल रॅलीद्वारे पर्यावरण जनजागृती Rating: 5 Reviewed By: DNA Live24