History of Maharashtra

'प्रेस क्लब'च्या 'ईद मिलन'द्वारे सामाजिक एकतेचा संदेश


अहमदनगर । DNA Live24 - महिनाभराच्या उपवासानंतर ईदचा दिवस मुस्लिम बांधव आनंदाने साजरा करत असतात. जवळच्या व्यक्तींना आपुलकीने बोलवून आपल्या आनंदात त्यांनाही सहभागी केले जाते. प्रेस क्लबच्या कार्यक्रमात तीच आपुलकी जाणवली. ईद मिलनच्या कार्यक्रमाद्वारे स्नेहभाव जपला जातो. तुम्ही आमचे आहात व आपण सर्व धर्मिय एकच असल्याचे सांगून, जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

प्रेस क्लबच्या वतीने रमजान ईदनिमित्त हाजी अजीजभाई चष्मावाला मार्ग, झेंडीगेट येथे ईद मिलनचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी महाजन बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम, तहसीलदार सुधीर पाटील, कोतवालीचे पोलिस निरीक्षक अभय परमार, मराठी पत्रकार परिषदेच्या नाशिक विभागीय सचिव मिनाताई मुनोत, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, सामाजिक कार्यकर्ते राजाराम भापकर गुरुजी आदि उपस्थित होते.

यावेळी महाजन म्हणाले की, प्रेस क्लबने घेतलेल्या ईद मिलनच्या कार्यक्रमाने सर्व धर्मियांमध्ये प्रेम व एकोपा वृध्दीगंत होणार आहे. जिल्ह्यात अनेक विषय असून, यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. सर्वांच्या सहभागाने विकासात्मक वाटचाल शक्य असून, देश बलशाली बनविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत मन्सुर शेख यांनी केले. प्रास्ताविकात महाराष्ट्र टाईम्सचे विजयसिंह होलम यांनी दरवर्षी प्रेस क्लबतर्फे सर्व सण-उत्सव एकत्रित व उत्साहात साजरे केले जात असल्याचे सांगितले.

होलम यांनी प्रेस क्लबतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी प्रेस क्लबच्या ईद मिलन कार्यक्रमाद्वारे जातीय सलोख्याचा संदेश दिला. अशा कार्यक्रमाद्वारे सामाजिक शांतता व कायदा सुव्यवस्था टिकून राहणार असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार महेश देशपांडे महाराज यांनी केले. आभार महेश पटारे यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget