History of Maharashtra

‘स्नेहस्पर्श’मध्ये सोनाबाईंना सुरक्षेसह निवारा

अहमदनगर । DNA Live24 - तीन मुली आणि एक मुलगा असतानाही ७२ वर्षांच्या सोनाबाईला कोणीही सांभाळत नव्हते. कुर्ला( मुंबई) येथील पदपथावर पाउस-ऊन झेलत लोकांनी फेकलेल्या अन्नावर ती दिवस काढत होती. अलीकडे कुठल्याही वयोगटातील रस्त्यावरील बेसहारा महिलांवर सर्रास अत्याचार होत असल्याने नेहरूनगर (मुंबई) पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कोपर्डे यांना तिची काळजी वाटली. त्यांच्या संवेदनशीलतेमुळे सोनाबाईला नगरच्या स्नेहस्पर्शमध्ये निवारा व सरंक्षण मिळाले आहे.

पोलिस निरीक्षक कोपर्डे यांनी मुंबईत, पुण्यात व अनेक ठिकाणी सोनाबाईला आसरा शोधला. परंतु अशा एकाकी महिलांना निःशुल्क आसरा देणारी संस्था आढळली नाही. त्यांनी स्नेहालयच्या पत्यावर आपले पत्र देऊन स्वयंसेवकासोबत पाठविले. स्नेहालयने अद्याप ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम प्रकल्प सुरु केलेला नाही. पण आश्रयासाठी आलेल्या या महिलेला परत रस्त्यावर पाठवल्यास तिच्यावर अत्याचार होऊ शकतात, हे लक्षात घेऊन स्नेहालयने तिला प्रवेश दिला.

अशा प्रकारच्या ज्येष्ठ आणि एकाकी महिलांना आश्रय देणारे ‘स्नेह स्पर्श’ हे केंद्र स्नेहालयने या घटनेनंतर सुरु केले आहे. पहिल्या टप्यात १५ महिलांना येथे प्रवेश देण्यात येणार असून यातील सक्षम असलेल्या ७ महिलांना शुल्क आकारले जाणार आहे. तर ८ महिलांना त्यातून विनामुल्य सांभाळले जाईल. केडगावात नव्याने उभारलेल्या ‘अहमदनगर इंटरनॅशनल सेंटर’ येथे सध्या ‘स्नेहस्पर्श’ कार्यरत आहे. प्रवेशासाठी ९०११०२०१७६ (भारत) येथे संपर्काचे आवाहन स्नेहालय संस्थेतर्फे केले आहे.

केडगावात नव्याने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाची जबाबदारी भारत कुलकर्णी, अतुल महाडिक, संगीता लीजडे, शफिक शेख, वंदना आणि राजू भोसले यांनी स्वीकारली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget