History of Maharashtra

महिला क्रिकेट : पहिला विश्वकप जिंकण्याची संधी हुकली


लंडन । DNA Live24 - आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये टीम इंडियाचा अवघ्‍या 9 धावांनी पराभव झाला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी भारतासमोर 229 धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघाची सुरुवात डळमळीत झाली होती. मात्र पुनम आणि हरमनप्रीत कौरने 95 धावांची शानदार भागिदारी करत डाव सावरला. तरीही भारताचा आख्खा संघ ४८.४ षटकांत २१९ धावांतच गारद झाला.

हरमनप्रीत आणि पुनमने या सामन्‍यात चमकदार अर्धशतकी खेळी केली. मात्र पुनम आणि हरमनप्रीत बाद झाल्‍यानंतर भारताचा डाव पत्‍त्‍याप्रमाणे ढासळला. त्‍यानंतर एकही फलंदाज खेळपट्टीवर टीकाव धरु शकला नाही. निम्‍म्‍या फलंदाजाना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारताची संपूर्ण टीम 48.4 ओव्‍हरमध्‍ये 219 धावांवर ऑलआऊट झाली आणि इंग्लंडने अवघ्‍या 11 धावांनी विजय मिळवून विश्‍वचषकावर आपले नाव कोरले. इंग्‍लंडने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावून 228 धावा केल्या होत्‍या.

वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कपचे फायनल भारत आणि इंग्लंडच्या संघात लॉर्ड्सच्या मैदानावर खेळले गेले. 34 वर्षांपूर्वी कपिल देव यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने याच मैदानावर भारतासाठी पहिले वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला होता. इंग्लडने भारतावर मात करत अवघ्या ९ धावांनी विजयाची नोंद करत जगज्जेतेपद पटकावले आहे. इंग्लंडने पटकावलेला हा चौथा वर्ल्ड कप आहे. भारतीय संघात पूनम राउत, स्मृती मंधाना, मिताली राज (कप्तान), हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, शिखा पांडेय, सुषमा वर्मा (wk), झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड़ आणि पूनम यादव यांचा समावेश होता.

Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget