History of Maharashtra

15 दिवसांत पेट्रोलपंपावर सुरळीत गॅस पुरवठा


अहमदनगर । DNA Live24 - शहरातील पेट्रोल पंम्पावर एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हा अ‍ॅटो रिक्षा, टॅक्सी चालक मालक संघटना, पेट्रोलपंम्प मालक, एचपी गॅस व इंडियन पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी यांची जिल्हा पुरवठा अधिकारी संदिप निचीत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक झाली. या बैठकित पेट्रोल पंम्प मालक व पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी यांनी येत्या पंधरा दिवसात एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिले.

शहरातील सक्कर चौक येथील ओम मातोश्री पेट्रोलपंम्प व केडगाव येथील रामचंद्र अ‍ॅण्ड कंपनी पेट्रोलपंम्प येथे दहा ते पंधरा दिवसापासून एलपीजी गॅसचा पुरवठा बंद झाल्याने, रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झाला होता. यामुळे रिक्षाचालकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली असताना, संघटनेने पुढाकार घेवून जिल्हा पुरवठा अधिकारी यांना या प्रश्‍नासंदर्भात निवेदन देवून पाठपुरावा केला. या अनुशंगाने सोमवारी ही बैठक बोलविण्यात आली होती. यामध्ये विविध विषयांवरही चर्चा झाली.

या बैठकित येत्या पंधरा दिवसात पेट्रोलपंम्पावर गॅस पुरवठा सुरळीत करण्याबाबत तोडगा निघाला. मातोश्री पेट्रोलपंम्पचे संचालक बाळासाहेब पवार यांनी दिवसातून ८ तास गॅसपुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, कार्याध्यक्ष कॉ. बाबा आरगडे, एचपी पेट्रोल कंपनीचे सचिन चव्हाण, इंडियन ऑईलचे अभय करण, उपाध्यक्ष दत्ता वामन, सचिव अशोक औशीकर, सल्लागार विलास कराळे, जितेंद्र शिंदे, गोरख आंबेकर, गणेश गांगर्डे, लतिफ शेख, नासीर शेख, चंद्रकांत काजवे, श्रीकांत दंडवते उपस्थित होते.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget