History of Maharashtra

परिचारिका या रुग्णांसाठी देवदूतच - वारंग


अहमदनगर । DNA LIve24 - परिचारिका हे रुग्णासाठी देवदूत असतात. त्यांच्या अथक परिश्रमाने रुग्ण बरे होतात. आपण पाहतो अनेकदा रुग्णांसाठी परिचारिकेचे कार्य नवसंजीवनी ठरते. वैद्यकीय अधिकारीही परिचारीकेच्या कार्यामुळे आनंदित असतात. परिचारिका सेवेचे कार्य नि:स्वार्थ भावनेने करून रुग्णांना जीवनदान द्यावे, असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रभारी विभागीय अधिकारी दिनकर वारंग यांनी केले.

स्नेहालय संस्था आयोजित परिचारिका सहाय्यक प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जयमाला पवार (वरिष्ठ परिचारिका, जिल्हा रुग्णालय), डाॅ. प्रीती भोंबे, राजीव गुजर (सचिव, स्नेहालय) आदी उपस्थित होते. परिचारिकेने आपले धेय्य रुग्णाच्या कल्याणाकरिता द्यावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी परिचारिका सेवेच्या आद्यप्रणेत्या फ्लॉरेन्स नाईटेजेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात केली.

जयमाला पवार यांनी त्रिसूत्री पध्दतीनुसार काम करण्यास सांगितले. हात, हृदय आणि बुद्धी यांचे वापर करून रुग्णांचे काळजी घेण्यास सांगितले. यावेळी त्यांनी स्नेहालयाच्या प्रथम बँचचे परिचारिका सहाय्यक अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना रुग्णसेवा कार्याची शपथ दिली. कार्यक्रमाच्या प्रास्तविकतेत मा गुजर यांनी स्नेहालयाने नवीनच सुरु केलेल्या परिचारिका सहाय्यक अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली. तसेच अनुभव कथन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता गायकवाड हिने केले. तर उपस्थितांचे आभार स्नेहालयाचे सहसंचालक प्रविण मुत्याल यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान तुपे, सिद्धार्थ मिड्गुले, विकास सुतार, विष्णू आंबेकर आदींनी परिश्रम घेतले.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget