History of Maharashtra

रामनाथ कोविंद भारताचे नवे राष्ट्रपती


नवी दिल्ली । DNA Live24 - भारताच्या चौदाव्या राष्ट्रपती निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उमेदवार रामनाथ कोविंद विजयी झाले आहे. कोविंद यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला. राष्ट्रपती निवडणुकीत कोविंद विजयी झाले असल्याची अधिकृत घोषणा लोकसभेचे महासचिव व निवडणूक आयोगाचे रिटर्निंग ऑफिसर अनूप मिश्रा यांनी केली आहे.

राष्ट्रपतिपदासाठी १७ जुलैला मतदान झाले होते. संसदेच्या हॉल क्रमांक ६२ मध्ये गुरुवारी राष्ट्रपतीपदासाठीची मतमोजणी झाली. कोविंद यांना ६५.३५ टक्के, म्हणजेच ७ लाख २ हजार ४४ मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मीरा कुमार यांना एकूण ३४.३५टक्के, म्हणजेच ३ लाख ६७ हजार ३१४ मते मिळाली. के. आर. नारायणन् यांच्यानंतर तब्बल वीस वर्षांनी रामनाथ कोविंद यांच्या रुपाने देशाला दुसरा दलित राष्ट्रपती मिळाला आहे. के. आर. नारायणन यांनी १९९७ मध्ये देशाच्या राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली होती. 

संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये नव्या राष्ट्रपतींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली अाहे. नवा लाल गालिचा अंथरण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रामनाथ कोविंद यांचे अभिनंदन केले आहे. रामनाथ गोविंद यांचे नातेवाइक दिल्लीत पोहोचले आहेत. कोविंद यांच्या ‍विजयासाठी त्यांचे जन्मगाव परौंख (कानपूर देहात) येथे बुधवारी सायंकाळी यज्ञ करण्‍यात आला होता.

सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २४ जुलैला संपणार आहे. तर नवनिर्वाचित राष्ट्रपती २५ जुलैला शपथ घेतील. यूपी, त्रिपुरा, आणि गुजरातमधून मतांमध्ये फुटीचे प्रकार झाले होते. त्रिपुरात तृणमूलच्या ६, काँग्रेसच्या आमदाराने कोविंद यांना मत दिले. या पक्षांचा मीरा कुमार यांना पाठिंबा होता. यूपीत सपचे शिवपाल यादव, १५ समर्थक आमदार काही खासदारांनी कोविंद यांना मत दिले. पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांनी मीरा कुमारांना पाठिंबा दिला होता.

ही विचारधारेची लढाई - मीरा कुमार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. यूपीएने पूर्ण निष्ठेने निवडणूक लढवली आहे. देशातील बहुतांश लोकांचा आवाज आम्ही या निवडणुकीत उठवला आहे. हे गुप्त मतदान आहे आणि याबाबत मला कोणतेही भाष्य करायचे नाही.' - मीरा कुमार
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget