History of Maharashtra

उदयनराजे भोसलेंना अटक ! अंतरिम जामीनही मंजूर


कोल्हापूर । DNA Live24 - छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशज व राष्‍ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा पोलिसांनी अखेर मंगळवारी अटक केली. अटकेनंतर सातारा शहरात नागरिकांकडून उत्स्फूर्त बंद पाळला. उदयनराजेंना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीनही मंजूर केला आहे. 

खासदार उदयनराजे यांना पोलिसांनीच थेट न्यायालयीन कोठडी द्या, अशी मागणी केली होती. या गुन्ह्यात उदयनराजे यांच्या आवाजाचे नमुने पोलिसांनी घेतले असल्याने पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगितले. दुपारी 4 वाजता जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खासदार उदयनराजे यांना कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. यापूर्वी उदयनराजे यांचा अटकपूर्व जामीन मुंबई हायकोर्टाने फेटाळला होता. त्यामुळे ते पोलिसांसमोर स्वत:हून हजर झाले होते.

काय आहे प्रकरण - लोणंदच्या सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. तसेच ९ जणांना अटकही झाली आहे. मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर उदयनराजेंनी साताऱ्यात रोडशो केला होता. 36 हजार एकर जमिनीचे मालक असलेले उदयनराजे दोन लाख रुपयांची खंडणी मागतील का? असा सवाल उपस्थित केला जात होता.

राजकीय वादाची किनार - या प्रकरणाला राजकीय वादाचीही झालर आहे. जैन यांच्या कंपनीत कामगारांच्या दोन युनियन आहेत. एक उदयनराजेंच्या नेतृत्त्वाखाली तर दुसरी राम राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आहे. निंबाळकरांच्या युनियनला भोसलेंच्या युनियनपेक्षा जास्त मोबदला मिळतो, अशी तक्रार आल्याने उदयनराजेंनी जैन यांना 18 फेब्रुवारीला साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात बोलावले. तिथे हा प्रकार घडला.

बदनामीचे षडयंत्र - उदयनराजे यांना 2 लाखांच्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप राष्‍ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन केला होता.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget