History of Maharashtra

'युवानच्या' विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश !


अहमदनगर । DNA Live24 - युवान संस्थेच्या मदतीने उच्च शिक्षण घेत असलेल्या ३२ विद्यार्थ्यांनीं मागील शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय यश मिळवले आहे. संस्थेचा निकाल १००% लागला आहे. यातील आकाश जाधव यास शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे प्रथम वर्षात प्रवेश मिळाला. असे करणारा त्याच्या वंचित समाजातील तो पहिलाच विद्यार्थी आहे. याशिवाय इतरही विद्यार्थी कला, वाणिज्य, शास्र, तंत्रनिकेतन, औद्योगिक, अभियांत्रिकी इ. विविध विद्या शाखांत प्रथम अथवा विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

अनाथाश्रमध्ये वाढत अथवा पाल तांड्यावर राहून प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेत प्रतिकूल परिस्थितीतवर मात करत युवानचे विद्यार्थी येथपर्यंत आले आहेत. अनेक विद्यार्थी त्यांच्या कुटुंबात, समाजात प्रथमच उच्च शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्यांचे यश उल्लेखनीय आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आशाताई फिरोदिया, विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, डॉ. विकास आमटे, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अथर अमीर खान, राहुल कर्डिले, उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे, सी. ए. किरण भंडारी, अशोक पितळे, डॉ. सुजाता नरवडे, डॉ. निलम बागल, हेमंत लोहगावकर, नंदा यादव आदींनी अभिनंदन केले आहे.

यंदा १० अधिक अत्यंत गरजू विद्यार्थ्यांचे संपूर्ण पालकत्व स्वीकारण्याचा 'टीम युवान'चा संकल्प आहे. त्यासाठी व संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी, साहित्य, भोजन इत्यादीसाठी सहयोगाची गरज आहे. संस्थेच्या वसतीगृह व युवा केंद्रासाठी देणगीदाखल अथवा नाममात्र दरात नगर शहर परिसरात जागेचीही संस्थेला आवश्यकता आहे. लहानशा सहयोगातही वंचितांच्या जीवनात बदल घडविण्याचे मोठे सामर्थ्य असते. त्यामुळे दात्यांनी सढळ हातांनी 'युवान'ला मदत करावी, असे आवाहन संस्थेचे संस्थापक संदीप कुसळकर यांनी केले आहे. मदतीसाठी ९०११११८७८७ / ९८९०४८६५१० या क्रमांकावर संपर्क करावा.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget