History of Maharashtra

हातगाव पाणीपुरवठा योजनेसाठी हर्षदाताई काकडे आक्रमक !


शेवगाव । DNA Live24 - शेवगाव तालुक्यातील २८ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविणाऱ्या हातगाव पाणीपुरवठा योजनेतील अर्धवट कामे पुर्ण करुन, तातडीने कार्यान्वित करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप अभियंता ए. ए. मुळे यांना दिले. मुळे यांनी ही योजना कार्यान्वीत करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. तसेच मंगळवारी ११ जुलैला योजनेची पहाणी करण्याचे आश्‍वासन दिले.

शेवगाव तालुक्यातील हातगावसह 28 गावांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना सध्या काही गावामध्ये अर्धवट अवस्थेत आहेत. आधोडी, दिवटे, लाडजळगाव, आंतरवाली या गावांत पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत. काही ठिकाणी पाईपलाईन टाक्यांना जोडलेली नाही. तर काही ठिकाणी योजनेची कामे अर्धवट स्थितीत आहेत. काही ठिकाणी पाईप लिकेज झाले असून, पाईप गहाळ झाले आहेत. योजनेच्या अर्धवट स्थितीमुळे ग्रामस्थांपुढे पाण्याचा गंभीर प्रश्‍न उभा राहिला आहे.

अशा परिस्थितीत ग्रामस्थांवर बारा महिने दुष्काळाचे सावट आहे. हा भाग डोंगराळ असून विहीरींना पाणी नसल्याने महिलांना पाण्यासाठी वन-वन भटकावे लागते. हातगाव पाणी योजनेचा उपयोग या गावांना होण्यासाठी योजना तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी भाऊसाहेब पोटभरे, भारत लांडे, रामेश्‍वर पोटभरे, मनोहर पोटभरे, जालिंदर पोटभरे, गणेश पोटभरे, विनोद खंडागळे, सत्यवान खंडागळे, नामदेव कसाळ आदिंसह लाभार्थी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget