History of Maharashtra

झेडपी देणार मुलींना कराटे प्रशिक्षण !

वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत शालेय मुलींना कराटेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


अहमदनगर । DNA Live24 - जिल्ह्यात मुली व महिलांवरील लैंगिक अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत शालेय मुलींना कराटेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात या योजनेतून ६ हजार मुलींना प्रशिक्षण व स्वसंरक्षणाच्या धड्यांचा लाभ होणार आहे.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून महिला व शाळकरी मुली अत्याचाराच्या घटनांना बळी पडत आहेत. त्यामुळे २०१४-१५ सालच्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात पहिल्यांदा शालेय विद्यार्थिनींना कराटे व स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. पहिली दोन वर्षे म्हणजे २०१४-१५ व २०१५-१६ मध्ये दरवर्षी अंदाजे ६ हजार मुलींना याचा लाभ मिळाला.

नंतर गेल्या काही वर्षात काही कारणांमुळे कराटे प्रशिक्षण दिले नाही. यंदा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या अंदाजपत्रकात मुलींसाठी कराटे प्रशिक्षणासाठी ३० लाख रुपयांच्या भरीव निधीची तरतूद केली. यावर्षी मुलींना कराटे प्रशिक्षण देण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. महिला व बालकल्याण विभागाने पूर्वतयारी सुरु केली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरु होईल.

प्रशिक्षण देण्यासाठी दरवर्षी ठराविक शाळा निवडण्यात येत आहेत. किमान ३ महिने दररोज प्रशिक्षण देण्याचे नियोजन असते. या प्रशिक्षणात एखादा प्रसंग ओढवल्यास मुलींनी त्याला कसे सामोरे जायचे?, अनुचित प्रसंग ओढवल्यास त्याचा प्रतिकार कसा करावा?, प्रतिकार करतांना स्वतःची सुटका कशी करून घ्यावी?, याचे प्रशिक्षण दिले जाईल. 

दरवर्षी वेगळ्या शाळा - मुलींना कराटे व स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यात देणे शक्य नाही. त्यामुळे दरवर्षी वेगवेगळ्या शाळांची निवड करण्यात येत आहे. त्यासाठी प्रशिक्षित व नामांकित महिला प्रशिक्षकांची निवड केली जाणार आहे. वेगवेगळ्या शाळा दरवर्षी असल्याने प्रत्येक शाळेला याचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेतर्फे दोन वर्षे मुलींना कराटे व स्वसंरक्षणाचे धडे दिले. यंदाही दिले जाईल.  मागील दोन वर्षातील प्रशिक्षणाचा किती मुलींना फायदा झाला हे समजणे कठीण आहे. मात्र एखाद्या प्रशिक्षण दिलेल्या मुलीवर एखादा वाईट प्रसंग ओढवल्यास, प्रशिक्षणात शिकविल्याप्रमाणे प्रतिकार करून स्वतःचा बचाव केल्यास, जिल्हा परिषदेचा प्रशिक्षणाचा मूळ उद्देश साध्य होईल. - मनोज ससे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget