History of Maharashtra

पेट्रोल पंपावर रोकड चोरणारा जेरबंद


अहमदनगर । DNA Live24 - डिझेल भरण्याच्या बहाण्याने पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या युवकाच्या हातातील रोकड चोरुन पळालेल्या आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी जेरबंद केले आहे. चोरलेली रोकड, एक मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली कारही पोलिसांनी हस्तगत केली. किरण महादेव बनसोडे (रा. म्हेत्रे वस्ती, चिखली, हवेली, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे दोन साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. ही कारवाई गुरूवारी रात्री १ वाजेच्या सुमारास नगर ताालुक्यातील शहापूर शिवारात करण्यात आली.

आनंद पेट्रोलियम पंपावर अक्षय राजू आडुळे (रा. बाराबाभळी) हा कामाला आहे. गुरुवारी मध्यरात्री मारुती सुझुकी कंपनीची एक कार (क्र. एमएच १४ एफसी ०३१३) पंपावर आली. कारचालकाने खाली उतरुन दीड हजार रुपयांचे डिझेल टाकायला सांगितले. अक्षयने कारमध्ये डिझेल भरले. त्याचे बिल करत असताना कारचालकाने अक्षयच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. अक्षयच्या हातात असलेली साडेआठ हजारांची रोकड हिसकावून आरोपींनी कारमधून पोबारा केला.

अक्षयने तत्काळ या घटनेची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना सांगितली. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने, फौजदार गजानन करेवाड, सहायक फौजदार राजेंद्र गायकवाड, हेड कॉन्स्टेबल संजय घोरपडे, कुंडलिक आरवडे, पोलिस नाईक राजू सुद्रिक, बाळासाहेब जंबे, कॉन्स्टेबल राहुल द्वारके, आडसूळ, आव्हाड तसेच नागरिकांनी आरोपींचा पाठलाग सुरू केला.

दोन चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र किरण बनसोडेला पोलिसांनी कारसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरलेली रोकड व एक मोबाईलही मिळाला. पोलिसांना चौकशीदरम्यान त्याने चुकीचे नाव सांगितले होते. नंतर मात्र त्याचे खरे नावही समोर आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीही सुनावली आहे. सहायक पोलिस निरीक्षक देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा अधिक तपास फौजदार गजानन करेवाड हे करीत आहेत.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget