History of Maharashtra

भिंगारमध्ये युवकाकडून गावठी पिस्तुल जप्त

भिंगार बाजारात गावठी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या युवकाला पोलिसांनी सापळा रचून पकडले. रऊफ बाबुमिया शेख (वय २०, रा. आलमगीर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून


अहमदनगर । DNA Live24 - भिंगार बाजारात गावठी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या युवकाला पोलिसांनी सापळा रचून पकडले. रऊफ बाबुमिया शेख (वय २०, रा. आलमगीर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सहायक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार शुक्रवारी दुपारी २ वाजता ही कारवाई करण्यात आली.

भिंगारमध्ये एक युवक पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याचे शिंदे यांना समजले होते. त्यामुळे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील व सहायक अधीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने, फौजदार गजानन करेवाड, सहायक फौजदार राजेंद्र गायकवाड, पोलिस नाईक बाळासाहेब जंबे, कॉन्स्टेबल अडसूळ, राहुल द्वारके यांच्या पथकाने शेख याच्या घराशेजारी सापळा रचला.

रऊफ शेखला पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करुन त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे स्टील बॉडीचे एक गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी पंचांसमक्ष या वस्तू जप्त केल्या. शेखविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास भिंगार पोलिस करीत आहेत.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget