History of Maharashtra

सावेडीत धूमस्टाईल चोरट्यांचा उपद्रव सुरू


अहमदनगर । DNA Live24 - सावेडी उपनगरामध्ये धूमस्टाईलने मंगळसूत्र ओरबाडण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेले सलग दोन दिवस धूमस्टाईल पद्धतीने महिलांच्या गळ्यातील साेन्याचे दागिने ओरबाडण्यात आले. दोन्ही गुन्ह्यात एकूण सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. उपनगरातील महिला वर्गाने पुन्हा एकदा धूमस्टाईल मंगळसूत्र चोरांचा धसका घेतला आहे. या चोरांना पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

सोमवारी दुपारी ज्ञानेश्वरी मंगल थाेरात (रा. यशोदानगर, पाईपलाईन रोड, नगर) या रस्त्याने पायी जात होत्या. पाईपलाईन रस्त्यावरील मोरया मंगल कार्यालयाजवळ त्या आल्या असता पाठीमागून मोटारसायकलवरुन दोन अनोळखी युवक त्यांच्या जवळ आले. प्रशांत मेडिकलजवळ चोरट्यांपैकी एकाने थोरात यांच्या मानेला जाेराचा हिसका देवून त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपयांचे सोन्याचे मणीमंगळसूत्र ओरबाडले. हा प्रकार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला.

ज्ञानेश्वरी थोरात यांनी चोरट्यांचा पाठलाग करत मोठ्याने आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत चोरटे वेगाने पसार झाले होते. घटनेनंतर नागरिकांची गर्दी झाली होती. ज्ञानेश्वरी थोरात यांनी तोफखाना पाेलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. तोफखान्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल माळशिखरे हे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पाईपलाईन परिसरातच दत्तनगर कॉलनीच्या अंतर्गत रस्त्यावर घडला. सुनंदा चंद्रकांत तागड (रा. दत्तनगर, पाईपलाईन रोड, नगर) या रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून आलेल्या चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने बळजबरीने ओरबाडून चोरुन नेले. त्यांनीही आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरुन जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. 
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget