728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

प्रत्येकाने समाजाचे देणे असल्याचे भान ठेवावे - खलील अहमद


अहमदनगर । DNA Live24 - समाजामध्ये उच्चवर्ग व मध्यमवर्गा मध्ये दरी वाढत चालली आहे. मध्यमवर्गीय युवा पिढी कोणत्याही मार्गाने पैसा कमविण्यासाठी पुढे मागे विचार करत नाही. ज्यामुळे गुन्हागारी व फसवेगिरीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने समाजाचे काही देणे असल्याचे भान ठेवून सामाजिक कार्य करावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व ह्युमन राईटस् ऑर्गनायझेशनचे जनसंपर्क अधिकारी खलील अहमद यांनी केले.

खलील अहमद यांच्या वाढदिवसानिमित्त ह्युमन राईटस् ऑर्गनायझेशनच्या वतीने सिव्हील हॉस्पिटलमधील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ह्युमन राईटस् ऑर्गनायझेशनचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र थिटे, सिव्हिलचे निवासी वैद्यकीय अधिकारी मुंडे मॅडम, सदस्या माया जाधव, कामत मॅडम, अन्वर मुन्नावर सय्यद, रुग्णमित्र नादीर खान, अर्शद शेख, शेख मोईन, शेख मुख्तार अहमद, शेख इफ्तेखार, सय्यद अलीस, मुबीन शेख, सुफियान कांबळे, मोहंमद सैफ आदि मान्यवर उपस्थित होते.

मुंडे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या की, आज समाजामध्ये मनापासून सामाजिक कार्य करणाऱ्यांची दिवसेंदिवस संख्या कमी होत आहे. अशा वेळी समाजात विधायक व चांगले काम करणाऱ्यांची संख्या वाढण्याची नितांत गरज आहे. आपण केलेले कार्य खरच कौतुकास्पद असेच आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनवर सय्यद यांनी केले तर आभार नादीर खान यांनी मानले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: प्रत्येकाने समाजाचे देणे असल्याचे भान ठेवावे - खलील अहमद Rating: 5 Reviewed By: DNA Live24