History of Maharashtra

वडिलांच्या स्मृतीनिमित्त गरजूंना शैक्षणिक साहित्य


अहमदनगर । DNA Live24 - “मरावे परी कीर्ती रुपी उरावे” या उक्तीला उजाळ देत वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ योगेश गुंजाळ यांनी गोरगरीब मुलांकरिता शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. त्यांचे वडील भगवानराव गुंजाळ हे सामाजिक क्षेत्रात काम करत होते. आंदोलने, वडार समाज संघटना, भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी त्यांनी लढा दिला. त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांचा सामाजिक वारसा पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीने योगेश गुंजाळ यांनी हा उपक्रम राबवला.

गरजू मुलांसाठी चाईल्ड लाईनला शैक्षणिक साहित्याची आवश्यकता होती. त्यानिमित्ताने भगवानराव गुंजाळ फौंडेशनच्या वतीने गरीब, गरजू, अनाथ, निराधार तसेच झोपडपट्टी भागातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. फौंडेशनच्या माध्यमातून एखादे अनाथ, हरवलेले, भटकलेले, बालकामगार बालभिक्षुक तसेच शाळाबाह्य मुले आढळून आल्यास आम्ही तात्काळ चाईल्ड लाईनच्या १०९८ या मोफत क्रमांकावरती फोन करून त्या बालकाची मदत करू, अशी ग्वाही देण्यात आली.

यावेळी सोमा शिंदे (अध्यक्ष लोकशाही विचारमंच, नगर), निखील वारे(युवक सरचिटणीस),अजय अगवान, शिवाजी बोठे, निलेश गुंजाळ, दीपक गुंजाळ, पप्पू गर्जे,अमोल आल्हाट, वैभव भिंगारदिवे, आकाश खरपे, आशिष रोधिया, चाईल्ड लाईनचे सहसंचालक प्रवीण मुत्याल व सदस्य आलीम पठाण, महेश सूर्यवंशी, संकेत होले, अब्दुल खान, अमोल धावडे, माधुरी पवार उपस्थित होते.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget