History of Maharashtra

अवैध देशी दारुसह अडीच लाखांचा मुद्देमाल पकडला


अहमदनगर । DNA Live24 - वाहनांची तपासणी करताना हुलकावणी देऊन निसटण्याचा प्रयत्न करणारे एक संशयास्पद वाहन पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने अडवले. या वाहनात ताडपत्रीखाली लपवलेली देशी दारु आढळून आली. हा प्रकार शनिवारी सकाळी नगर-मनमाड रोडवर संयुक्त नाकाबंदी मोहिमेत उघडकीस आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक धनंजय लगड व एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या संयुक्त पथकाने ही कामगिरी केली.

आैरंगाबाद रस्त्याने अवैध देशी मद्याची वाहतूक करणारे एक वाहन येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्रीरामपूर विभागाच्या भरारी पथकाचे प्रभारी अधीक्षक गणेश बारगजे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली निरीक्षक धनंजय लगड, कॉन्स्टेबल विकास कंठाळे, प्रसाद चव्हाण, महिला कॉन्स्टेबल रत्नमाला काळापहाड यांनी औरंगाबाद रस्त्यावर सापळा रचला. मात्र, त्यांना माहिती मिळालेले वाहन अडवण्याचा प्रयत्न करुनही वाहनचालकाने हुलकावणी देत वेगाने धूम ठोकली.

उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही माहिती तत्काळ एमआयडीसी पोलिसांना कळवली. त्यामुळे सहायक निरीक्षक विनोद चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक स्वाती देवडकर, पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल मणिकेरी, पोलिस नाईक प्रविण खंडागळे, अशोक भालके यांनी नगर-मनमाड रस्त्यावर सापळा रचला. संशयित असलेले टाटा कंपनीचा छोटा एस टेम्पो (क्र. एमएच १६ एवाय ८६३९) त्यांनी अडवला. झडती घेतली असता टेम्पोच्या पाठीमागील बाजूला एका ताडपत्रीच्या खाली देशी दारुचे तीन बॉक्स, एक बिअरचा बॉक्स मिळून आला.

अवैध मद्य विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या आरोपीचे नाव अवधूत केशव मिरकुटे (वय २७, रा. सावतानगर, नेवासे) असे आहे. ही दारु अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे त्याने चौकशीत सांगितले. त्याच्याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने श्रीरामपूर विभागात गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक धनंजय लगड हे करीत आहेत.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget