History of Maharashtra

उत्कृष्ट नेटवर्क असेल, तर कार्यकर्त्यांची रेंज वाढते - जगताप


अहमदनगर । DNA Live24 - राजकारणात उत्कृष्ट नेटवर्क असेल, तर कार्यकर्त्यांची रेंज वाढते. राष्ट्रवादीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांची रेंज वाढली आहे. जीवनात मनुष्याने पाय जमीनीवर ठेवून काम करावे. मनुष्याची किंमत समाज ठरवित असतो. माळीवाडा, बारातोटी कारंजा येथील शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर हे होते.

याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, माजी महापौर अभिषेक कळमकर, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, संपत बारस्कर, संभाजी पवार, संजय झिंजे, प्रा. अरविंद शिंदे, सुरेश बनसोडे, हनिफ जरीवाला, ज्ञानदेव पांडूळे, सुमतीलाल कोठारी, शिवाजी विधाते, गजानन भांडवलकर, अमित खामकर, प्रकाश भागानगरे, ज्ञानेश्‍वर रासकर, दत्तात्रय राऊत, बाबासाहेब गाडळकर, वैभव ढाकणे, भाऊसाहेब कचरे आदि उपस्थित होते.

यावेळी जगताप म्हणाले, शहराच्या विकासकामासाठी आणलेल्या निधीस विरोधकांनी हरकती घेतल्या. सत्ताधाऱ्यांनी विकास कामासाठी अनुदान आणून दाखवावे. सर्वसामान्यांचे काम करणाऱ्यांना जनता स्विकारते. कार्यकर्त्यांच्या जीवावर दुसऱ्यांदा विधान परिषदेत काम करण्याची संधी मिळाली. प्रा. विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात राष्ट्रवादीचे कार्य उत्तम चालू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा. माणिक विधाते यांनी केले.

दादा कळमकर म्हणाले की, जातीय राजकारणाद्वारे युवकांच्या माथी अजूनही दंगलीचे खटले आहे. तरुणांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे काम मागच्या 25 वर्षात झाले. एमआयडीसीतील कारखानदारी मोडीत काढण्याचे काम शिवसेनेने केले. 25 वर्षे मागे वळून पाहताना शहरातील हजारो युवक बेरोजगारीच्या खाईत लोटल्याचे वास्तव चित्र सर्वांपुढे आहे. राष्ट्रवादीच्या पाठपुराव्याने शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. नागेश गवळी यांनी केले. आभार प्रकाश भागानगरे यांनी मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध विभाग, सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget