728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

रस्ता दुरूस्त करा, नाहीतर तोंडाला काळे फासू !


अहमदनगर । DNA Live24 - शहराबाहेरुन जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्याने दुरुस्तीचे काम रखडले आहे. ऐन पावसाळ्यात असलेल्या मोठ्या खड्डयांनी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या बाह्यवळण (राज्य महामार्ग रस्ता क्र. 222) रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी निंबळक गटातील ग्रामस्थांनी केली. तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम न झाल्यास २१ जुलैला सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या आंदोलन करुन, अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा देण्यात आला.

बाह्यवळणचे हस्तांतरण राष्ट्रीय महामार्गासाठी झाल्यानंतर सिमेंटचा चार पदरी रस्ता होणार असल्याने, दुरुस्तीसाठी पैसे वाया न घालवायची भुमिका घेवून, सार्वजनिक बांधकाम विभागाने आपली जबाबदारी झटकली आहे. यासाठी निंबळक गटातील ग्रामस्थांनी दोन वेळा रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करुन, या विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. शहरातून जाणाऱ्या जडवाहतुकीचे प्रमाण कमी होवून, अपघात टाळण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन बाह्यवळण रस्ता तयार केला.

मात्र एक ते दीड वर्षापासून या रस्त्याची मोठी दुरावस्था होवून, जागोजागी डांबर उखडून, मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी अनेक अपघात होवून अनेकांचे प्राण जात आहे. या रस्त्यावर वाहन चालकांना लुटण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या बाह्यवळण रस्त्याचे काम करण्यासाठी शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला मंजुरीचे पत्र दिले आहे. या रस्त्याच्या कामासाठी 17 कोटी रुपये मंजुर झाले आहेत.

मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग कुठल्याही प्रकारे दखल घेत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या मागणीचे निवेदन सहायक अधिक्षक अभियंता पी. डी. कोटकर यांना देवून, उपअभियंता घोडके, बडदे, कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. यावेळी निंबळकचे माजी सरपंच विलास लामखडे, ग्राम पंचायत सदस्य विलास होळकर, बाबा पगारे, अशोक शिंदे, अजय लामखडे, महादेव बडे, तौफिक पटेल, जगन्नाथ शिंदे, समीर पटेल, मुख्तार शेख, सद्दाम शेख आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: रस्ता दुरूस्त करा, नाहीतर तोंडाला काळे फासू ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24